Amruta Fadnavis : Uddhav Thackeray
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray Sarkarnama : Uddhav Thackeray
मुंबई

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस लाच प्रकरणात नवा ट्विस्ट; बुकी जयसिंघानी अन् उद्धव ठाकरेंचं कनेक्शन?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी एका डिझायनरविरोधात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यानंतर याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरच आता हल्लाबोल केला होता. मात्र आता या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आला आहे.

अनिक्षा जयसिंघानी ही भारतातील सर्वात मोठे बुकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल जयसिंघानी यांची कन्या आहेत. अमृता फडणवीस यांच्याशी त्यांची मागील पाच वर्षांपासूनची ओळख आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या चतुर्वेदी यांनी फडवीसांना गृहमंत्रीपदावरून बाजूला होऊन, या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची स्थापन करण्याची मागणी केली होती.

आता चतुर्वेदी यांनी ही मागणी केल्यानंतर बुकी अनिल जयसिंघानीसोबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो समोर आले आहे. हा फोटो २०१४ सालचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता या प्रकरणात वेगळे ट्विस्ट आले आहे.

दरम्यान, अनिक्षा हिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिक्षा हिची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यातील आणखी माहिती समोर येईल. मात्र आता उद्धव ठाकरे आणि बुकी अनिल सिंघानी यांचा व्हायरल होत आहे. यावर ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आले नाही. या फोटोबाबत चतुर्वेदी काय भूमिका घेणार हे याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाकडून अजूनही जयसिंघानी यांच्या कथित फोटो कनेक्शनसंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्यांकडून या फोटोबाबत करण्यात येत असलेला दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT