Amruta Fadnavis : Amruta Fadnavis files complaint against designer :
Amruta Fadnavis : Amruta Fadnavis files complaint against designer : SArkarnama
मुंबई

Amruta Fadnavis News : अमृता फडणवीसांना तब्बल १ कोटीच्या लाचेची ऑफर ; तक्रार दाखल!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासंदर्भात एक बातमी समोर येत आहे. अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या डिझायरने अमृता फडणवीसांना तब्बल १ कोटीची लाच ऑफर झाल्याची माहिती आहे. याबाबत आता अमृता फडणवीसांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमृता फडणवीस यांनी अनिक्षा नावाच्या एका डिझायनरची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार नोंदवल्यानंतर आता पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे, आणि त्या अनुषंगाने चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी या संदर्भात धमकी देणे, कट रचणे व लाच देऊ करणे, यासंदर्भातील कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये २० फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, अनिक्षा १६ महिन्यांपेक्षा जास्त काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होत्या. अनिक्षा हीने फडणवीसांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यामध्ये साहाय्य करण्याची मागणी करत, बुकींची माहिती देऊन 1 कोटी तुम्हाला देऊ, अशी खुली ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी दिली असल्याची माहिती आहे.

पोलीस तक्रारीत अमृता फडणवीस यांनी दावा केला आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षा हिने तिचे व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरुन पाठवण्यात आले. तसेच, धमकावण्याचा ही प्रयत्न केला होता.

अनिक्षा हिच्यासह, तिच्या वडिलांविरोधात अमृता फडणवीसांनी तक्रार केली. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड् यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT