Andheri By election 2022 latest news sarkarnama
मुंबई

Andheri By election : भाजपचा मेगाप्लॅन ठरला ; 10 वॉर्ड अन् 10 आमदार

Andheri By election : पोलिंग बुथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांकडे देण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी (Andheri By election 2022) शनिवारपासून सुरु झाली आहे. ठाकरे गट, शिंदे गट-भाजप असा सामना येथे होत आहे. दोन्ही गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या मतदारसंघात दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे, आपली ताकद पणाला लावत आहेत.बैठकांचे सत्र सुरु आहे. (Andheri By election 2022 latest news)

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत अंधेरी मतदारसंघातील प्रत्येक वार्डाची जबाबदारी आमदारांना दिली आहे. अंधेरीतील 10 वॉर्डसाठी भाजपचे दहा आमदार मैदानात उतरणार आहेत. तर, पोलिंग बुथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांकडे देण्यात आली आहे.

बैठकीला प्रतोद प्रसाद लाड, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, मुंबई प्रभारी आमदार अतुल भातकळकर, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर,पराग अळवणी, अमित साटम, कॅप्टन तमिल सेलवन, यांच्यासह जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. अंधेरीत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. ऋतुजा लटके यांच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे.

ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पटेल कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने लटके-पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT