Anganwadi Workers and Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Anganwadi Workers News : मानधन थकलं ; अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या पवित्र्यात

Shinde Government Anganwadi Workers : शिंदे-फडणवीस सरकारबाबत नाराजी

सरकारनामा ब्यूरो

Anganwadi Workers upset over Shinde Government : मानधन थकल्याने अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अंगणवाडी सेविकांचे मानधन आणि अन्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन दोन महिने उलटले तरीही हा प्रश्न सुटला नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारबाबत नाराजी आहे.

मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळाले नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे मानधन तातडीने देण्यात मिळावे, अशी मागणी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केली आहे.

ही मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काही दिवसांत पुन्हा अंगणवाडी सेविका आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने दिला आहे.

राज्य सरकारनं मागच्या वर्षी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कर्नाटक राज्यामध्ये जवळपास 11000 इतके मानधन असून येत्या काळात तेही मानधन वाढवण्याचा कर्नाटक सरकार विचार करत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन तर सोडाच परंतु आम्हाला निदान महिना 15000 रुपये मानधन वाढवून मिळेल अशी अशा होती. पण, सरकारने आम्हाला नुसतेच आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे.

  • येत्या काळात अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची वीस हजार पदे भरण्यात येणार आहेत.

  • अंगणवाडी सेविकांचे चालू मानधन हे 8325 इतके होते आता ते 10000 रुपये करण्यात आले आहे. म्हणजे 1675 रुपयांचे वाढ करण्यात आले आहे.

  • अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 वरून 5500 करण्यात आले जवळपास 1075 रुपये यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT