anil deshmukh alleges parambir singh Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Anil Deshmukh: Video देशमुखांनी नव्या वादाला तोंड फोडलं; खळबळजनक दावा, परमबीर सिंग अन् फडणवीस यांच्यात 'डील'...

Anil Deshmukh Alleges Parambir Singh Devendra Fadnavis: अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडी मालकाची हत्या झाली. त्या घटनेचा मास्टर माईंड परमबीर सिंग होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले.

Rajesh Charpe

Nagpur News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. "माझ्यावर आरोप करण्यासाठी तत्कालीन मुंबईचे पोलिस आयुक्त आणि फडणवीस यांच्यात एक डील झाले होते," असा दावा देशमुख यांनी आज केला. आता त्याला फडणवीस काय उत्तर देताना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस आणि देशमुख यांच्यातील शाब्दिक वाद नागपूरच्या फोस्टरवर झळकला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज देशमुख यांनी नव्या वादाला तोंड फोडले.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडी मालकाची हत्या झाली. त्या घटनेचा मास्टर माईंड परमबीर सिंग होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले. त्यातून माझ्यावर आरोप लावण्याचे डील दोघांमध्ये झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

चांदीवाल आयोगाबाबत बोलताना फडणवीस यांनी तो अहवाल महाविकास आघाडीचे सरकार असताना आला होता. त्याच दरम्यान आमचे सरकार पाडण्यात आले. प्रत्येकाला ५० खोके देऊन सरकार भाजपने पाडले. त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सादर केलेला अहवाल जाहीर होऊ शकला नाही.

तो दोन वर्षांपासून गृह खात्याकडे पडून आहे. देवेंद्र फडणवीस या खात्याचे प्रमुख आहेत. आपण यापूर्वी सुद्धा चांदीवाल आयोग जाहीर करण्याची विनंती दोन वेळा केली. मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. हा अहवाल सादर झाला तेव्हा माध्यमांनी आपल्याला क्लिनचिट दिल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. कदाचित याच कारणामुळे तो जाहीर केला जात नसल्याची शंका अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT