Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच ; कारागृहातील मुक्काम वाढला..

Anil Deshmukh : सीबीआयची विनंती मान्य केल्याने देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

सरकारनामा ब्युरो

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. सीबीआयने त्यांच्या जामीनावरील स्थगिती वाढवून मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. सीबीआयची ही विनंती मान्य केल्याने देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. (Anil Deshmukh latest news)

अनिल देशमुख यांना गेल्या १२ तारखेला त्यांना जमीन मंजूर करण्यात आला होता. पण सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांचा जामीन अर्जाला मुंबई न्यायालयाने १० दिवस स्थगिती दिली होती. आज त्यावर सुनावणी झाली.

देशमुख यांच्या जामीनावरुल स्थगिती ता. ३ जानेवारीपर्यंत ठेवावी, असे सीबीआयने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले होते, यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावर स्थगिती ता. २७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुख यांना ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. या प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला आहे.

देशमुखांना ईडीच्या तपासात जामीन मिळाला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल (मंगळवारी) जामीन मंजूर झाला आहे. ते आज कारागृहाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT