nawab malik, anil deshmukh
nawab malik, anil deshmukh  sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडी मोठा धक्का ; देशमुख, मलिकांना मतदानासाठी परवानगी नाकारली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभेसाठी उद्या (ता.१०) मतदान होणार होत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण महाविकास आघाडीला दोन मते कमी पडणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक यांना मतदानासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. आज न्यायालयाने याबाबत निर्णय दिला.

मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या देशमुख, मलिक कारागृहात आहेत.दोघांनी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्याला ईडीनं विरोध केला.

लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर काल (ता.८) सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आज (गुरुवार) त्यावर न्यायालयाने निर्णय दिला. महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाल्याने त्याचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन्ही नेत्यांच्या अर्जावर ईडीने कायद्याचा हवाला देत मतदानाला बाहेर जाता येणार नसल्याचे म्हटलं आहे. ईडीने १९५१ कलम ६२(५) चा हवाला दिला आहे.'जर एखादा व्यक्ती जेलमध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, असं ईडीनं म्हटलं आहे.

मलिक आणि देशमुख राज्यसभा मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची मागणी करू शकतात पण इतक्या कमी वेळात सुनावणी होऊन निकालाची शक्यता कमी असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे नेते याबाबत उच्च न्यायालयात जाणार आहेत.

काल दिवसभर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या अर्जावर मॅरेथॉन सुनावणी झाली. मलिक यांचे वकील ऍड. अमित देसाई तर देशमुख यांचे वकील ऍड. आबाद पोंडा हे मतदान करण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT