Anil Deshmukh News  Sarkarnama
मुंबई

Anil Deshmukh News : देशमुख जेलमधून सुटणार; पण न्यायालयाच्या 'या' आदेशामुळे होणार अडचण

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांची तब्बल १४ महिन्यानंतर तुरुंगातून सुटका होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या जामीना वरील स्थगिती वाढवण्याचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे देशमुख यांचा कारागृहातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मुंबईतून तीन महिने तरी बाहेर जाता येणार नाही अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देशमुख हजर राहू शकणार नाहीत.

देशमुख उद्या बाहेर येणार असल्याने नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला ते जाणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र, न्यायालयाने जमीन देताना टाकलेल्या एका अटीमुळे ते हिवाळी अधिवेशनाला मुकणार आहे. देशमुखांना जामीन देताना त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्यानंतरही अधिवशेनाला जाता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनिल देशमुख गेले १३ महिने २६ दिवसांपासून आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर उद्या कारागृहातून सुटणार असल्याने देशमुख यांच्या मतदारसंघ असलेल्या नागपूर विभागामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.

देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर नागपूरमध्ये केव्हा दाखल होतात याची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस शमुख यांची नागपूरमध्ये येणे संदर्भात वाट पहावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर देशमुख यांना तीन महिने तरी मुंबई सोडता येणार नसल्याची माहिती देशमुख यांच्या वकिलांकडून मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT