Anil Jaisinghani News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या कथित लाच प्रकरणातील सहआरोपी अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. अनिल जयसिंघानी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासोबतच्या मधुर संबंधांची चर्चा आता सुरू झाली आहे. मारिया यांनी जयसिंघानीला दोनदा पोलीस संरक्षण दिले. मात्र दोन्ही वेळा फडणवीसांनी ते काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
२०१४ मध्ये राकेश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जयसिंघानीला पोलीस संरक्षण दिले. २०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी गृहखातंही फडणवीस यांच्याकडेच होतं. पण भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. बाराशे कोटी रुपयांच्या वर्ल्डकप बेटिंग प्रकरणातील सूत्रधाराला संरक्षण का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात एक वर्षापूर्वी पोलीस संरक्षण दिले होते आणि ते मागे घेतले जाईल. त्याप्रमाणे जयसिंघानीचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. तेव्हापासून अनिल जयसिंघानी फरारआहे. त्यानंतरही राकेश मारिया यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, अशी पोलिस दलातच चर्चा होती.
अनिल जयसिंघानी यांचे पोलिस संरक्षण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी दोनदा काढून टाकले होते.राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात २०१० मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट बुकी असलेल्या जयसिंघानी याला पोलीस संरक्षण असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.जयसिंघानी याला विशेषाधिकार का दिला जात आहे, असा जाब त्यांनी विचारला. या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाल्याचे पाहून तत्कालीन गृहमंत्री आरआर पाटील यांनी जयसिंघानी याचे पोलीस संरक्षण काढून घेतले.
२०१५ मध्ये एका हेअर सलून मालकाने जयसिंघानी आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जयसिंघानीच्या मुलाची आणि सलून मालकाशी भांडणे झाली. त्यानंतरही जयसिंघानी यानेदेखील सलूनवाल्याला फोनवरून धमकी दिली. फरार जयसिंघानीला शोधण्यासाठी मोबाईल लोकेशन का घेतले नाही, मुलासोबत संपर्कात असूनही पोलीसांनी चौकशी का केली नाही असे अनेक प्रश्न मारिया यांच्याबाबत उपस्थित करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्त उचलबांगडी केली. त्यांची होमगार्ड महासंचालकपदी बदली करण्यात आल्यामुळे मारिया हे फडणवीसांवर नाराज असल्याचीही चर्चा त्यावेळी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.