Anil Parab, Devendra Fadanavis
Anil Parab, Devendra Fadanavis Sarkarnama
मुंबई

अनिल परबांचा फोन तपासा! भाजप-शिवसेना युती होणार होती की नाही, याचे उत्तर मिळेल...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. ४० आमदारांना सोबत घेवून शिंदे यांनी भाजपाशी (BJP) युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. सुरुवातीला शिवसेना आमदारांसोबत बाहेर पडलेल्या शिंदेंना हळूहळू राज्यभरातून नगरसेवक, पदाधिकारी आणि त्यानंतर खासदारांचाही पाठिंबा मिळाला.

मात्र या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केल्याची खळबळजनक माहिती मागील आठवड्यात समोर आली होती. बंडखोर आमदार परत येणार नाहीत, अशी खात्री पटल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केला होता. "मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण शिंदेंना सोडा, अशी ऑफर त्यांनी फडणवीसांना दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली होती.

नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता, असे वृत्त 'साम' वाहिनीने दिले होते. "पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, आता ही वेळ निघून गेली आहे, उशीर झाला आहे," असे उत्तर उद्धव ठाकरे यांना भाजपकडून सांगण्यात आले होते असेही त्यांच्या वृत्तात म्हटले होते.

यावर बोलताना आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, मी आपल्याच माध्यमांमधून याबाबतच्या बातम्या ऐकल्या. म्हणजे जो आपल्या पक्षातील नंबर दोनचा नेता आहे, जो आपल्याला वडिलांप्रमाणे मानतो, त्याच्याबाबतीत असा विचार करायचा म्हणजे, मग आमच्या सारख्या सामन्य शिवसैनिकांची काय होईल.

आता हे जर खोट असेल तर मग अनिल परबांचा फोन तपासा, त्यामधून जर फडणवीसांना फोन गेला असेल तर हे घडलं आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण मला माहित आहे, उद्धव साहेब कधीही स्वतःच्या फोनवरुन फोन लावत नाहीत. ते परब यांच्या फोनवरुनच फोन करतात. त्यांचा फोन चेक करा, आणि ही बातमी खरी असले तर मग आज भाजप का नको?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT