Anna Hazare Sarkarnama
मुंबई

Anna Hazare News: मोठी बातमी: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल...

Anna Hazare Health Issues: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सोमवारी (ता.31 ऑगस्ट) तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सोमवारी (ता.31 ऑगस्ट) तातडीनं मुंबईला हलवण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे यांच्या प्रकृतींबाबत अनेक तक्रारी समोर आल्याची माहिती समोर येत आहे. त्यात ताप, अशक्तपणा, खोकला आणि निर्जलीकरण यांचा समावेश आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून राळेगण सिद्धी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते.

मात्र, आता हजारे यांना किडनीच्या तपासणीसाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .

मुंबईतील नामांकित बॉम्बे रुग्णालयाच्या डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हजारे हे गेल्या काही दिवसांपासून विषाणू संसर्ग आणि डिहायड्रेशनमुळे त्रस्त आहेत.

आता बॉम्बे रुग्णालयात दाखल केल्यानंतर अण्णा हजारे यांच्यावर डॉक्टर भन्साळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांचा रिपोर्ट आल्यावर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT