Anna Hajare , Arvind Kejriwal News Sarkarnama
मुंबई

Anna Hazare reacts arvind kejriwal :..तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे ; अण्णा हजारेंचा घणाघात

Anna Hazare reacts to summons to arvind kejriwal : मनिष सिसोदिया आज जेलमध्ये आहेत, याचे मला दुःख..

सरकारनामा ब्युरो

Anna Hazare reacts to cbi summons to arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आज (ता.१६) केजरीवाल यांची चौकशी होणार आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

केजरीवाल यांच्या चौकशीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'केजरीवाल यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे," असे अण्णा हजारे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी अण्णा हजारे बोलत होते.

अण्णा हजारे म्हणाले, "पैसासाठी काहीही करणे अयोग्य आहे. दारुमुळे कुणाचेही भले झाले नाही. दिल्ली सरकारचे केलेल्या मद्य गैरव्यवहाराची सीबीआय करीत आहे. यात केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, "

भष्ट्राचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनातून जन्म घेतलेल्या आम आदमी पार्टी सध्या भष्ट्राचारात अडकली आहे, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हजारे म्हणाले, "आमच्या आंदोलनात आम आदमी पक्षाचा जन्म झाला असेल तरी आम्ही राजकारणापासून अप्लित आहोत. मनिष सिसोदिया आज जेलमध्ये आहेत, याचे मला दुःख आहे. समाज आणि देशाच्या कल्याणासाठी जेलमध्ये जावे लागले तर जा, पण स्वार्थासाठी जेलमध्ये जाऊ नका,"

थेट मुख्यमंत्र्यांची चौकशी होणार असल्याने आज सीबीआय मुख्यालयाबाहेर निमलष्करी दलाच्या कर्मचार्‍यांसह दिल्ली पोलिस 1000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केली आहे. राऊस एव्हेन्यू येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येणार आहे.

2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. सिसोदिय हे सध्या कारागृहात आहेत, त्यांच्या जामिनावर १८ एप्रिल रोजी सुनावणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT