Sharad Pawar - Ajit Pawar Politics : Sarkarnama
मुंबई

NCP Political Crisis: शरद पवारांचा आणखी एक साथीदार सोडणार साथ; 'या' दोन खासदारांची नावे चर्चेत

अनुराधा धावडे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दिवसेंदिवस या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र होत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्याने त्या आमदारांना अपात्र करण्यात यावं, यासंदर्भातील याचिका अजित पवार गटाकडून विधिमंडळात दाखल करण्यात आल्याची माहिती काल समोर आली होती.

याला काही तास उलटत नाहीत, तर शरद पवार यांच्या जवळच्या आणखी एका खासदार आणि आमदाराने अजितदादांच्या गटाची वाट धरल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, ते आमदार आणि खासदार कोण याबाबत तर्कवितर्क काढण्यास सुरुवात झाली आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

या खासदार आणि आमदाराने त्यांची प्रतिज्ञापत्रे अजित पवारांच्या गटाकडे दिल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील यांच्या नावांची दबक्या आवाजात कुजबूज सुरू आहे, तर राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण किंवा फौजिया खानही यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

अजित पवारांनी समर्थक आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे हेदेखील होते; पण काही तासांतच ते शरद पवारांकडे गेले, तर राज्यसभेच्या वंदना चव्हाण आणि फौजिया खान यादेखील पहिल्यापासूनच शरद पवारांसोबत आहेत. पण शरद पवार यांच्या गटाने पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या गटातील आमदारांना तत्काळ अपात्र करा, अशी मागणी अजित पवार यांच्या गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT