Urfi Javed Vs Chitra Wagh:
Urfi Javed Vs Chitra Wagh:  Sarkarnama
मुंबई

Urfi Javed Vs Chitra Wagh: अपना टाईम भूल गई'.. म्हात्रे प्रकरणावरुन उर्फीने चित्रा वाघांना पुन्हा डिवचलं...

सरकारनामा ब्युरो

Urfi Javed On Chitra Wagh: दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद रंगला होता. उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघांनी तिला चांगलंच धारेवर धरलं होतं. तर चित्रा वाघ यांच्याविरोधात मारहाणीची शक्यता व्यक्त करत उर्फीनेही राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. हे प्रकरण काहीसं थंड पडलं असताना आता उर्फीने चित्रा वाघांना डिवचलं आहे. यामुळे पुन्हा या दोघींमधलं भांडण डोकं वर काढण्याची शक्यता आहे.

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते.या रॅलीतील व्हीडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता. या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीमधील हा व्हिडिओ आहे. 'मातोश्री'नावाच्या (Matoshree Page) फेसबूक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवरुन शिवसैनिक आक्रमक झाले होते.

याला कारणही तसचं आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत आपण शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.सोबतच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरुन ट्विटही केलं आहे. '' “शीतल (म्हात्रे)…तू लढ, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादीत नाहीच. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे की या हरामखोरांना सोडू नकाच. पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा”, असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याचवरुन आता उर्फीनेही चित्रा वाघांवर निशाणा साधला आहे. “अपना टाईम भूल गई” असं म्हणत उर्फीने चित्रा वाघांना डिवचलं आहे. “कोई इस औरत को बताओ की हिपोक्रसी की भी सीमा होती है”, असं उर्फी जावेदनं हिंदीतून केलेल्या या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. “अपना टाईम भूल गई, जब मेरे कपडों की वजह से मेरे कॅरेक्टर पे उंगली उठा रही थी. मुझे जेल भेजने की मांग कर रही थी. खुलेआम मेरा सर फोडने की धमकी दी थी. व्वा, व्वा, व्वा!” असं उर्फीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता शीतल म्हात्रे प्रकरणावरून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पुन्हा पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता याला चित्रा वाघ काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुन्हा एकदा या दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT