Pravin Darekar On CM Uddhav Thackeray
मुंबई : '' ठोका ठोकी या अविर्भावात असणाऱ्यांना उत्तर देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी घेतला आहे. इशारा देणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत, अशी प्रतिक्रीया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी (१४ मे) झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राणा दांपत्यावर सडकून टीका केली.
या टीकांवर बोलताना प्रवीण दरेकर यांनीही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. ''आम्ही महाराष्ट्रातले नाही आहोत का? की हा पक्ष पाकिस्तानातून आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आली की, मुंबईचे लचके तोडतायत, मुंबई तोडू पाहत आहेत, असे आरोप केले जातात. कोणी मुंबई तोडायला आलेलं नाही, तुमच्या भ्रष्टाचारापासून मुंबईला मुक्त करायचं मराठी माणूस, हिंदू कोणीही यांच्यासोबत नाही, फडणवीस म्हणाले होते, असा खुलासाही यावेळी दरेकर यांनी केला.
नकली कोण, असली कोण हे जनता ठरवत असते. भाजपचे हिंदूत्व देश जाणतो. राम मंदिर निर्माण असो किंवा इतर गोष्टीं, भाजप कोणासोबत जात नाही, असंही दरेकरांनी सांगितलं. पणसत्ता महत्वाची वाटत असल्यामुळे त्यांना आता कावीळ झाल्यासारखं जग पिवळं दिसायला लागलं आहे. कोट्या आणि टोमण्यापलीकडे त्यांच्या भाषणात टीकाही मिळत नाही.
माझा प्रश्न आहे, एखाद्याच्या शरीरयष्टी, व्यंगावर बोलणं हे विकृत मानसिकतेतून आलेलं नाही का? जनता राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब पाहत असेल तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे तुम्ही नेऊ शकत नाही, तो राज साहेब नेत आहेत, असंही दरेकरांनी स्पष्ट केलं.
उद्या काय होईल माहीत नाही, पण आपण कृतीतून केलं, दाऊदला साथ देणारे यांच्या बरोबर असलेल्या नावब मालिक यांची पाठराखण करतात. 100 कोटींचा आरोप असलेला देशमुख जेलमध्ये आहे. दाऊदचे भाजपशी सबंध असूच शकत नाही. पण हे नवाब मलिकांचं लांगून चलन करत आहेत.
यावेळी प्रविण दरेकरांनी सकाळच्या शपथविधीच्या टीकेवरही निशाणा साधला. मंत्री मंडळात एक मिनिटं स्थान मिळू शकत नाही. अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून मांडीला मांडी।लावून बसलात. पण त्याच अजित पवारांसोबत आज तुम्ही मांडी लावून बसलात, असा टोलाही त्यांनी लगावला. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात तुम्ही वक्तव्य करू शकला नाहीत. आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक चकार शब्द काढला नाहीत, त्या प्रवृत्तीला तुम्ही सहकार्य करता का, असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला.
केतकीच्या वक्तव्याचं समर्थन नाही. अशा प्रकारे जेष्ठ नेत्यांविषयी केतकी चितळेच काय कोणीही वक्तव्य करणं योग्य नाही. आमच्या नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. केतकी चितळेसारखे लोक ट्विट करतात, त्यांच्यासाठी समान कायदा असायला हवा, आमचे नेते काही बोलले की त्यांच्यावर कारवाई होते. मग कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी बोलतात, त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असंही त्यांनी विचारलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.