सातारा : गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...च्या जयघोषात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरी दरवर्षी प्रमाणे पर्यावरण पूरक आणि साध्या पद्धतीने गणपतीचे आगमन झाले. साताऱ्यातील "सुरुची" या त्यांच्या निवासस्थानी शिवेंद्रसिंहराजे यांचे पुत्र रुद्रनिलराजे यांच्या हस्ते चांदीची मूर्ती आणून त्याचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर गणपती बाप्पाची आरती करून जगावरचे कोरोनाचे विघ्न गणपती बाप्पाने घालवावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. Arrival of environmentally friendly Ganesha at the house of Satara MLA Shivendrasinharaje Bhosale
सौ. वेदांतिकराजे म्हणाल्या, वर्षांनुवर्षे आम्ही पर्यावरण पुरक गणेशाची स्थापना करतो. भाऊसाहेब महाराजांनी बनविलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतो. हीच आपली महाराष्ट्राची खरी परंपरा आहे. पूर्वी मातीचा गणोबा बसवले जात होते. त्यानंतर प्लॉस्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती बनविल्या जाऊ लागल्या. पण आमच्याकडे पहिल्यापासून पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना केली जाते.
.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेली दोन वर्षे आपण कोरोनाशी लढा देत आहोत. जगावरचे हे विघ्न श्री गणेशाने सर्वांच्या आयुष्यातून नव्हे, तर जगातून घालवावे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्या. उत्सव आहे, सण आहे, त्यामुळे मास्क न वापरणे किंवा गर्दी करणे टाळावे. कोरोनात सर्व निर्बंध पाळून आनंदात उत्सव साजरा करावा.
आवश्य वाचा : राज्यसभेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागणार का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.