Lawrence Bishnoi Gang Sarkarnama
मुंबई

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई गँगची कारागृह प्रशासनालाच धास्ती, व्यक्त केली टोळी युद्धाची भीती

Lawrence Bishnoi Gang News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग सध्या चांगलीच चर्चेत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला तीन ते चार वेळा धमकीचे फोन, मेसेज आणि ईमेल आले आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 09 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची हत्या आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग सध्या चांगलीच चर्चेत आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला तीन ते चार वेळा धमकीचे फोन, मेसेज आणि ईमेल आले आहेत. धमकी देणाऱ्या आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी (Lawrence Bishnoi Gang) कनेक्शन असल्याचंही सतत समोर येत आहे. त्यामुळे बॉलीवूडसह सर्वसामान्यांकडून या गँगबद्दल भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र, आता ही गँग ज्या कारागृहात आहे तेथील प्रशासनानेच भीती व्यक्त केली आहे. बिश्नोई गँगचे सदस्य सध्या आर्थर रोड कारागृहात असून या ठिकाणी या कैद्यांमध्ये टोळीयुद्ध होऊ शकते अशी भीती तुरुंग प्रशासनाने व्यक्त केली आहे. शिवाय या टोळीतील सदस्यांची अन्य कारागृहात बदली करावी यासाठी तुरुंग प्रशासनाने न्यायालयात अर्ज देखील केला आहे.

त्यामुळे आता या लॉरेन्स बिश्नोई गँगची धास्ती तुरुंग प्रशासनाला देखील असल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या (Salman Khan) बंगल्यावर झालेला गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना अन्य तुरुंगात हलवण्याची मागणी तुरुंग प्रशासनाने केली आहे.

बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) हत्याप्रकरणी 15 आरोपी आणि सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबारातील 5 असे दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेले एकूण 20 आरोपींना सध्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं आहे. तर हे आरोपी तुरुंगात स्वतःचा गट तयार करू शकतात.

त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कारागृह प्रशासनाने वर्तवली आहे. तर आर्थर रोड कारागृहात डी-गँग आणि छोटा राजनच्या टोळीच्या सदस्यांसह विविध टोळ्यांचे कैदी देखील बंदिस्त आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT