CM Uddhav Thackeray News
CM Uddhav Thackeray News Twitter/@Shivsena
मुंबई

''मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद...'': उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शिवसैनिकांकडे 'ही' इच्छा

सरकारनामा ब्युरो

CM Uddhav Thackeray News

मुंबई : ''मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, शिवसैनिकाने मुख्यमंत्री व्हावे, याबाबत आपण आग्रही होतो.आता मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या (Shivsena) ताब्यात असावे एवढीच इच्छा आहे, कोविडच्या काळात जनतेने आपल्याला सांभाळून घेतले असे कृतार्थ उद्गार व्यक्त करत आजही मास्क काढायला भीती वाटते असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

भारतीय विमा कर्मचारी महासंघाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. शिवसेनेने कायम माणूस आणि मराठी जनतेच्या प्रश्नाला हात घातला. मुख्यमंत्री बनणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, मी मुख्यमंत्री होईल, असं माझ्या स्वप्नातही आलं नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. मी मुख्यमंत्री होईल, असं जरी मला वाटलं नाही तरीपण मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाचं असावा हे माझं स्वप्न होतं. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिन, हे ही माझं स्वप्न आहे." अशा भावना यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. मी म्हणजे मी नाही माझा पक्ष तो एक नंबर राहिला पाहिजे.

पण आता जबाबदारी वाढली आहे. हर कदम हम आपके साथ है हा विश्वास असला पाहिजे. तुम्ही आपली शिवसेना हा देशभर नेलीत. आता माझं जे स्वप्न आहे, सिर्फ एक हे देखील पूर्ण कराल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अलीकडे खासगीकरणाची खाज वाढली आहे. कुठे कुठे खाजवणार काय माहित, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. पण भगव्यामध्ये लढण्याची ताकद आहे हे सिद्ध केले पाहिजे. 14 तारीखला मी सभा घेत आहे. किती दिवस हे ऐकणार, दुसरी बाजू पण येऊ दे की, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT