Sandeep Deshpande
Sandeep Deshpande  Sarkarnama
मुंबई

Sandeep Deshpande Attack : आरोपीविरोधात 'ही' धक्कादायक बाब समोर; तब्बल १३ गुन्हे दाखल आणि...

सरकारनामा ब्यूरो

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आता देशपांडे हल्लाप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले दोन संशयित आरोपींना भांडूप परिसरातून ताब्यात देखील घेण्यात आले होते. मात्र, याचदरम्यान आता देशपांडे हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अशोक खरात हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध तब्बल 13 गुन्हे नोंद आहेत.गवळी गँग मधील एकाची हत्या केल्याच्या गुन्ह्यात देखील खरात आरोपी आहे. खरात विरोधात MCOCAअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. तसेच भांडुप परिसरात खरात राजकारणात सक्रिय असून दोन वेळा लोक जनशक्ती नावाच्या पार्टीकडून पालिकेची निवडणूक त्यानं लढवली आहे.

परिसरात दहशत निर्माण करून आपला दबदबा वाढवणं हा या हल्यामागचा उद्देश असल्याचं पोलीस सांगत असेल तरी त्याला राजकीय पार्श्वभूमी असण्याची देखील दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे हे खरात उपाध्यक्ष असून ती भारतीय कामगार सेना महासंघाशी संलग्न असल्याचं देखील समोर आलं आहे.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे

संदीप देशपांडे यांच्यावरच्या हल्ल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहिती समोर आली. यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. अशोक खरात वय 56 आणि किशन सोळंकी अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातला अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे, तर दुसरा आरोपी किशन सोळंकी याचं वय 35-40 आहे. भांडूपमधून एका 56 वर्षांच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. या दोघांना भांडूपमधून अटक करण्यात आली आहे. मात्र, आता या हल्ला प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला आहे.

संशयितांच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांची धडक

मनसे नेते संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील चिरागनगर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांच्या घराबाहेर जाऊन मनसेच्या नेते अविनाश जाधव हे कार्यकर्त्यांसह धडकले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांची विविध पथके तपास करीत आहेत.

या घटनेची माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्या दोघांच्या घराबाहेर धडकले. यावेळी येथील एका महिलेसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचा वादही झाला. अखेर पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT