Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 
मुंबई

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा जाहीर करताच, एकनाथ शिंदेंनी उचलले 'हे' पाऊल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. पण ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा जाहीर करताच मुख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) एकत्रित महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या शनिवारपासून (२९ ऑक्टोबर) नंदुरबारमधून या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याचेही बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांचा दौरा सुरू होण्याआधीच शिंदे- फडणवीस त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे राज्याचा दौऱ्याची घोषणा केली. दोन-तीन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरूनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्थिर झाली आहे. त्यातच अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं गेलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. यात लक्षणीय बाब म्हणजे या दौऱ्यानिमित्त चाळीस बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या विविध सभा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंनी दौरा जाहीर केल्यानंतर आज शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला. महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच शिंदे-फडणवीसही एकत्रित दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात विशेष लक्ष दिले जाईल. त्यामुळे आता जनात शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याला प्रतिसाद देते की उद्धव ठाकरेंच्या हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कुणाच्या दौऱ्याला किती प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT