Asaduddin Owaisi, rahul gandhi  sarkarnama
मुंबई

ओवैसींचे राहुल गांधींना थेट आव्हान ; म्हणाले, नशीब अजमावून पाहा...

"राहुल गांधी यांनी बेडकालाही निवडणूक लढण्यासाठी आव्हान दिलं आहे,"

सरकारनामा ब्युरो

हैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकताच तेलंगणाचा दौरा केला. यावेळी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. त्याला एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसी यांनी राहुल गांधी (rahul gandhi) यांना हैदराबाद येथून निवडणूक लढण्याचे आव्हान दिलं आहे.

टीआरसी,भाजप आणि एमआयएम यांना देण्यासाठी राहुल गांधी दौऱ्यावर आले होते. "राहुल गांधी यांनी कुठुनही निवडणूक लढवली तर त्यांचा पराभव होईल. त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी हैदराबाद येथून निवडणूक लढवून दाखवावी. आपलं नशीब अजमावून पाहावं, त्यांचा पराभव नक्कीच आहे," "राहुल गांधी यांनी बेडकालाही निवडणूक लढण्यासाठी आव्हान दिलं आहे," अशी खोचक टीका ओवैसी यांनी केली आहे.

पुढच्या वर्षी तेलंगणा येथे विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी टीआरएससोबत युती करण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. "टीआरएससोबत युती करण्याची भाषा करणाऱ्यांना काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येईल," असा सज्जड दम गांधी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

ज्यांनी तेलगंणाला लुटलं त्यांच्यासोबत कधीही युतीही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार, असे गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांना हरविण्यासाठी युवकांनी काँग्रेसमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे, असे आवाहन राहुल गांधींनी युवकांना केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या स्वप्ने पूर्ण केली नाहीत.

राहुल गांधी म्हणाले, "तेलंगणा हे नवीन राज्य आहे. त्याला राज्याचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. हे राज्य कुणा एका व्यक्तीसाठी तयार झालेले नाही. तेलगंणाच्या जनतेची स्वप्न पूर्ण झाली नाही, फक्त एका परिवारालाच त्याचा फायदा झाला आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT