सातारा : कोरोना सर्व्हेसाठी दर दिवशी ५० रुपये मोबदला देण्यात यावा. आशांना किमान १८ हजार रुपये वेतन द्यावे. गटप्रवर्तकांचा प्रवासभत्ता दुप्पट करा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा आशा वर्कर्स संघटनेने आज सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर निदर्शने केली. तसेच, संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना मागण्यांचे निवेदन दिले. Asha Seviks hold agitation on Zilla Parishad ground ...
संघटनेच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, माणिक अवघडे, कल्याणी मराठे, राणी कुंभार, सुवर्णा पाटील, पल्लवी नलावडे, रूपाली पवार, जयश्री काळभोर, रंजना फुले, रंजना पवार, शोभा कळंबे, मंगल जाधव, ज्योती यादव, सुवर्णा कदम, सुषमा अवकिरकर, उषा वेल्हाळ, विद्या कांबळे, पुष्पा मगर, सुमन वसव यासह आशा व गटप्रवर्तका सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला परवानगी नाकारल्याने काही काळ जिल्हा परिषदेच्या बाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संतप्त आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद मैदानावर ठिय्या मांडला. याबाबत आनंदी अवघडे म्हणाल्या, ''आशा व गटप्रवर्तकांना मास्क, सॅनिटायझर ही सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात पुरवावीत. गटप्रवर्तकांना झेरॉक्स, स्टेशनरीसाठी ५ हजार रुपये द्या.''
आवश्य वाचा : `मला वातावरण पेटवायला दोन मिनीटे लागतील`
''गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये किमान द्यावेत. आशा व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये कोरोनासाठी ग्रामपंचायतीने द्यावेत आदी विविध मागण्यांसंदर्भात शासनाला एक महिना नोटीस देवूनही कोणतीही चर्चा न करता आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेले दीड वर्ष फ्रंटलाईन वर्कर्स व कोरोना योद्धा म्हणून जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली. तरीदेखील तुटपुंज्या मोबदल्यावर शासन राबवून घेत आहे.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.