Ashish Shelar On Maha Viakas Aghadi: मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांची महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महायुतीमध्ये सर्व काही ओके आहे पण आघाडीत एकमेकांना एकमेकांपासूनच धोके असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना रात्रीच्या वेळेस कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पटोलेंच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. (Nana Patole Accident)
पटोलेंचा अपघात झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) भाजपवरती अप्रत्यक्ष आरोप केले होते. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. शिवाय पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर भाजपकडून (BJP) हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते. शिवाय त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना देखील भाजप नेत्यांनी केली होती. याच सर्व पार्श्वभूमिवर आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
नेहमीप्रमाणे त्यांनी एक्सवर एक कविता पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चुकलेत आमच्या नानांचे ठोके, मात्र महायुतीमध्ये एकदम ओके, काँग्रेसने ठाकरेंशी मैत्री केली, ठाकरे गटाच्या मैत्रीला तर दुश्मनाची ही सर येणार नाही. असं म्हणत त्यांनी ठाकरेंसह शरद पवारांनाही (Sharad Pawar) डिवचलं आहे.
आशिष शेलार यांनी एक्सवरील पोस्ट
चुकलेत आमच्या नानांचे ठोके!
काय झाडी, काय डोंगार; महायुतीमध्ये एकदम ओके..!
आघाडीत एकमेकांना, एकमेकांचेच धोके!
वर्षानुवर्षे काँग्रेसला, काँग्रेसनेच हरवलं
त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचे ठरवलं
या गटाच्या मैत्रीला तर, दुष्मनाची ही नाही येणार सर
ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर !
साहेबांच्या गटाची, तर काय सांगावी ख्याती?
गावभर भांडणं लागली की, साहेब म्हणणार
आपली ताई आणि आपली बारामती !!
काय झाडी, काय डोंगार; एकदम सगळं कसं ओके
काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!
मागील काही दिवसांपासून आशिष शेलार हे कवितांच्या माध्यमातून विरोधरांवर टीका करत आहेत. कालच त्यांनी 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि त्याचं सेम नसतं.' अशी कविता शेअर करत. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. अशातच त्यांनी आज आणखी एक कविता शेअर केली आहे. त्यामुळे आता आघाडीतील नेते शेलारांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.