Ashish Shelar- kishori pedanekar  Sarkarnama
मुंबई

आशिष शेलार संतापले; ही शिवशाही की हुकूमशाही

भाजपच्या सेल्फी विथ खड्डा आंदोलनादरम्यान पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे आता भाजप अधिक आक्रमक झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने आज मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी (Andheri MIDC) परिसरात मुंबई महापालिकेच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलीसांनी काही आंदोनकांवर लाठीचार्ज केला. या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीसांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish shekar) यांनी केली आहे.

भाजप च्या वतीने आज मुंबईत खड्ड्यांविरोधात आंदोलन केले. मात्र अंधेरी MIDC इथे भाजप युवा मोर्चा यांच्या पोलिसांनी लाठी चार्ज केला, त्यांचे कपडे फाटले, असे म्हणत आशिष शेलार यांनी प्रशासनावर सडकून टिका केली आहे. "आंदोनकांवर झालेली कारवाई ही ही शिवशाही की तानाशाही,'' असा सवालच शेलारांनी विचारला आहे. तसेच, आंदोलन करत असताना आंदोलकांचे कपडे फाडणार असाल, त्यांना मारणार असाल तर मंत्रालायत काय लाठ्या काठ्या घेऊन आंदोलन करायचे का, असेही त्यांनी विचारले आहे.

तर, दूसरीकडे, या मोर्चा दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावरील खड्ड्यात लोळत होते, आंदोलकांनी पोलिसांशी वाद घातला, आंदोलक आक्रमक होत असल्याचे पाहून एमआयडीसी पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस भाजप आंदोलक आणि पोलीसांमध्ये चढाओढ झाल्याचे काहींनी सांगितले. याशिवाय मुंबई महापालिका दरवर्षी खड्डा भरण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करते, तरीही रस्त्यातील खड्डे बुजवले जात नाहीत, असा आरोप भाजपा आंदोलकांनी केला आहे.

तर दूसरीकडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या आंदोलनावर स्पष्टीकरण देत आपली भुमिका मांडली आहे. भाजपने मुंबईत ''सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१" ही स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला महापालिकेकडून प्रतिसाद दिला जाईल, ज्या कोणाचा सेल्फी विथ खड्डा असा फोटो येईल त्याला प्राधान्य देऊन तो खड्डा बुजवण्यात येईल. त्याचबरोबर मुंबईच्या रस्त्यांवर ज्या ठिकाणी खड्डे असतील ते प्राधान्याने बुजविण्यात येतील, अशी खात्रीही किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

तसेच, त्यांनी आंदोलकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची विनंतीही केली आहे. तुम्ही विरोधक आहात, तुम्हाला विरोध करण्याचा, प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आंदोनक करताना कोरोना नियमांचे पालन जरुर करा, कोरोना अजून गेला नाही, त्यामुळे स्वत ची काळजी घेऊन आंदोलने करा, अशी विनंती महापौर पेडणेकरांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT