Ashish Shelar
Ashish Shelar  sarkarnama
मुंबई

शेलारांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर ; मराठी शाळा बंद कुणी केल्या, वाझेला वसुलीला कुणी बसवले ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून आज भाजपच्या (bjp) 'मिशन मुंबई'वर जोरदार टीका करण्यात आली आहे, त्याला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शेलारांनी एक पत्रक टि्वट करीत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता आणखीच वाढण्याची शक्यता आहे. (ashish shelar latest news)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. आज देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहे. "फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा," असे शेलार यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

"महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले...तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले..? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे...आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार ? कि आणखी त्याच्यापण पुढे? असा रोख सवाल शेलारांनी शिवसेनेला केला आहे.

मराठी माणसात फूट

"दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता... पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्र्त्तेत कोण बसले ? असा सवाल त्यांनी केला आहे. फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट, असे शेलार यांनी म्हटलं आहे.

भगव्याला का बदनाम करताय ?

आजच्या सामनाच्या अग्रलेखात सुरेश भट यांच्या कवितेच्या माध्यमातून शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे. त्यावर शेलार म्हणतात, "आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय ? नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे,"

हे मिशन नव्हे "कमिशन"

हे मिशन नव्हे "कमिशन" कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले.."बंधू" राजांनी वेगळी चूल मांडली..खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले...वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले..तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच. स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT