मुंबई : प्रदेश भाजपचे अधिवेशन चंद्रकांतदादांच्या उदघाटनाच्या भाषणाने गाजले. या भाषणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा एक मुद्दा जास्त चर्चिला गेला. तो मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले, असे वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे या भाषणावर शिंदे गटाकडून जोरदार प्रतिक्रिया आल्याने त्या भाषणाचा व्हिडीओ भाजपच्या सोशल मिडिया प्लॅटफार्मवरून हटविण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतही सारेच आलबेल नसल्याचा संदेश गेला.
या साऱ्यांवर खुलासा करण्यासाठी शेलार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पाटील असे म्हणालेच नाहीत, असा दावा केला नाही. उलट पाटील यांनी जे वक्तव्य केले ते तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना होत्या. चंद्रकांत पाटील यांनी फक्त त्या भावना व्यक्त करण्याचे काम केले. त्यांचा तो निर्णय नाही, असे शेलार यांनी व्यक्त केले
"तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मनातील भाव चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. त्यांचा तो निर्णय नाही, तसेच बैठकीतील त्यांचे भाषण बाहेर कसे आले? हे पाहत आहोत, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असे शेलार म्हणाले. हे भाषण भाजपच्या सोशल मिडियावरून लाईव्ह दाखविण्यात आले होते. तरीही शेलार यांनी हे भाषण बाहेर कसे आले, याची चौकशी जाहीर केल्याने आणखी भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी शेलार यांनी या बैठकीत समंत झालेल्या प्रस्तावांबाबतही माहिती दिली. "राजकीय, कृषी विषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव बैठकीत समंत झाले, असे त्यांनी सांगितले. राजकीय प्रस्ताव मांडताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अधोगतीवर चर्चा झाली. भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या शिवसेनेने (ShivSena) नवीन सरकार स्थापन केले. या सरकारचे अभिनंदन करण्यात आले, असेही शेलार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.