Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

आशिष शेलार म्हणाले, शिवसेनेकडे केवळ अधर्म राहिला...

सरकारनामा ब्युरो़

मुंबई - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबई भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची बुस्टर डोस सभा आज आयोजित केली होती. या सभेत बोलताना भाजपचे नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ( Ashish Shelar said, Shiv Sena has only iniquity left ... )

आशिष शेलार म्हणाले, महिन्याभरापासून मुंबई भाजप पोलखोल सभा करत आहे. मुंबईकरांच्या पैशाचा हिशोब शिवसेनेला, सत्ताधाऱ्यांना विचारत आहोत. मुंबई महापालिकेचे एक पत्र मी काल पाहिले. यात मुंबई महापालिकेचा लोगो व ब्रिद वाक्य होते. यात जिथे धर्म आहे तिथे विजय आहे, असे संस्कृतमध्ये लिहिले आहे. कालपर्यंत युतीमध्ये आमच्या बरोबर ते होते. म्हणून धर्म त्यांच्या बरोबर होता. आता तुम्ही आम्ही धर्माच्या रस्त्याने चालत आहोत. मात्र शिवसेनेकडे केवळ अधर्म राहिला आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, जो हनुमान चालिसाला, राम वर्गणीला विरोध करेल. राम मंदिरच्या जागेचा प्रश्न उपस्थित करेल. माहिम माटुंग्याच्या दत्त मंदिराला तोडायला निघेल. प्रभादेवीच्या मंदिरासमोर अडचण निर्माण करील, लालबागचा राजा होऊ देणार नाही. चिंतामणचा चिंचपोकळी होऊ देणार नाही. त्याच्या बरोबर धर्म कसा असेल?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या सभेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा, चित्रा वाघ, नितेश राणे आदींसह भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीकृष्ण रुपी फडणवीस

सर्व अधर्मांची मूळ म्हणजे शिवसेना आहे. धर्माचे अधिष्ठान असलेली पांडवांची टोळी, श्रीकृष्ण रुपी देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात येथे आहे. म्हणून येता काळ मुंबईकरांना विजय देणार आहे. येणारा काळ तुमचा, आमचा भाजपचा आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT