Ashish  Shelar
Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

नरहरी झिरवळ यांनी निलंबित बारा आमदारांना बोलावलं... पण?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Assembly Session) गदारोळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या (BJP) बारा आमदारांचा आज (ता.10 जानेवारी) विधानसभा उपाध्यक्षांकडे निलंबनाबाबत पुनर्विचार होणार होता. मात्र, त्यावर आज काहीच फैसला झाला नाही. यामुळे उद्या (ता. 11 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आमचे मत विधीमंडळ सचिवाकडे आम्ही मांडले असून आता आमची बाजू आम्ही न्यायालयात मांडू, असे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले आहे.

निलंबन करण्यात आलेल्या भाजपच्या बारा आमदारांचा आज फैसला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, याबाबत काहीच दिलासा मिळाला नाही. यामुळे उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निलंबन करण्यात आलेल्या आमदारांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी भाजपचे 6 आमदार गेले होते. याबाबत शेलार म्हणाले की, अधिवेशन नसताना आम्हाला सुनावणीसाठी बोलावण्यात आले. अधिवेशन सुरू असताना याबाबत निर्णय झाला नाही. उद्या न्यायालयात सुनावणी आहे. त्याच्या आधी यांनी आम्हाला बोलावले हे कुणालाही कळू शकते. त्यामुळे आम्ही आमची काय ती बाजू न्यायालयातच देऊ, असे त्यांनी सांगितले. तसेच, याबाबत जयमकुमार रावल म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सांगितले की सभागृहात दादा मागा मात्र, सुप्रीम कोर्टाची सुनावणी असताना दोन दिवस आधी बोलावले याचे आश्चर्य वाटतेय. आम्हाला वाटले नव्हेते की आमचे निलंबन केले जाईल. अधिवेशन काळात यावर विचार व्हायला हवा होता. आज पुनर्विचार होईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. मात्र, कोर्टावर आम्हाला विश्वास वाटतो, असे मत रावलांनी व्यक्त केले आहे.

आजच्या झालेल्या या सुनावणीला आमदार अतुल भातखळकर, गिरीश महाजन व राम सातपुते यांना कोरोनाची लागण झाल्याने उपस्थित राहू शकले नाही. याबाबत भातखळकर यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र दिले होते. सर्वोच्य न्यायालयाने 14 डिसेंबर 2021 रोजी विधिमंडळास नोटीस जारी केली होती. निलंबित आमदारांनी याबाबत अर्ज करूनही अधिवेशन कालावधीत काहीच निर्णय घेतला गेला नाही. आता उपाध्यक्ष यांना अध्यक्षपदाचा प्रभारी चार्ज असल्याने थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यामुळे आता लेखी उत्तर तुर्तास विधीमंडळ सचिव यांना कळवत असल्याचे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशानात विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. एक वर्षासाठी या सदस्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित सदस्यांना वर्षभर मुंबई आणि नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया आदींचे निलंबन करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी आता उद्या होणार आहे. याबाबत न्यायालयात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT