CM Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

अशोक चव्हाणांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यायची तयारी दाखवली होती..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली राजीनाम्याची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेतील बंड संपविण्यासाठी काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक सल्ला दिला होता. आज ठाकरे सरकारची शेवटची मंत्रीमंडळ बैठक झाली. या वेळी अनेक मंत्र्यांनी ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले. अशोक चव्हाण यांनी तर आम्ही दोन्ही काॅंग्रेस तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो, पण बंडखोरांना परत बोलवा, अशी सूचना त्यांनी दिली. ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

आज केलेल्या फेसबुक संदेशात ठाकरे यांनी दोन्ही काॅंग्रेस शिवसेनेला दगा देतील, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात आपल्याच लोकांनी दगा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचे `पुण्य` त्यांना मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या. हा आनंद त्यांना घेऊ द्या. मला मुख्यमंत्रीपद सोडण्याचा अजिबात खेद नाही.

अशोक चव्हाण यांच्यासह दुसरे मंत्री सुनील केदार यांनीही ठाकरे यांचे कौतुक केले. ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला, हे आपले भाग्य होते, अशी भावना केदार यांनी व्यक्त केली. आपल्या आजारपणाच्या काळात ठाकरे यांनी राज्याचे कुशलतेने नेतृत्व केल्याचे केदार यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

  • एखादी गोष्ट चांगली सुरु असेल तर त्याला दृष्ट लागली.

  • सुप्रिम कोर्टाचा निकाल मान्य.

  • महाविकास आघाडी सरकारने शेवटपर्यंत जनतेच्या भल्याचे निर्णय घेतला.

  • सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या निधीपासून सुरुवात केली.

  • शिवसेनेला ५६ वर्ष झाली. या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साध्या साध्या माणसांना मोठं केले. अगदी पान टपरी, रिक्षा चालक, टपरीवाले, यांना नगरसेवक, आमदार, खासदार केले. माणसं मोठी झाली.

  • ज्यांनी आपल्याला मोठे केले. त्यांनाच विसरली. जे काही देता येईल ते दिले. साधी-साधी माणसं येत आहेत. पण ज्यांना दिले ते नाराज.

  • ज्यांना नाही दिले ते सोबत आहेत. हेच जे नाते आहे, त्याच जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली आहे.

  • लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार.

  • त्यांनी तातडीने बहुमत सिद्ध करायला सांगितले.

  • पण त्यांनी त्याच वेगाने १२ आमदारांची यादी मंजूर केली असती तर आम्हाला बरं वाटलं असंत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT