Ashok Chavan Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan in BJP : राज्यसभेसाठी चव्हाणांसोबत 'या' नेत्याचेही नाव; भाजपमधील नेत्यांनी लपवली नाराजी

BJP Politics : आयात नेत्यांना राज्यसभेची लॉटरी, भाजपमधील नेते तिथेच

Jui Jadhav

Mumbai Political News :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश झाला. राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. हे वर्ष निवडणुकींचेदेखील आहे. त्यामुळेच या वर्षी अनेक राजकीय गणिते बदललेली दिसून येतील. पहिली निवडणूक राज्यसभेची आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांचे नाव नक्की झाले असले तरी आणखी एका नावाच्या चर्चेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बाहेरून आलेल्यांना राज्यसभेत संधी

27 फेब्रुवारीला राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. 15 तारखेला नाव देण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, या सगळ्यात भाजपकडून दोन नावांची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेले अशोक चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहेत. त्यामुळेच या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. आयात नेत्यांना भाजपमधून राज्यसभेवर पाठवले जाते आणि पक्षातील नेते तिथेच आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.

या नावांमुळे भाजपचे जुने चेहरे नाराज होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. मधल्या काही काळात त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्यांच्या नावाला पूर्णविराम लागल्याचे समजते. त्यामुळे त्यांची नाराजी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी कुठलीही मागणी केली नाही - चव्हाण

अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) भाजप प्रवेशानंतर आता त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. मात्र, मी या पक्षात कोणतीही मागणी केलेली नाही, असे अशोक चव्हाण म्हणालेत. मी काँग्रेस (Congress) पक्षात शेवटपर्यंत काम केले आणि कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विकासासाठी आणि मोदींवर विश्वास ठेऊन मी इथे आल्याचे चव्हाणांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर मी कुणालाही आमंत्रण दिले नाही. ज्यांना यायचे आहे ते येतील, अशी पुस्ती चव्हाणांनी जोडली.

'पटोलेंना महत्त्व देऊ नका - फडणवीस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अशोक चव्हाणांविरोधात ट्विट करत त्यांच्या घोटाळ्यावर भाष्य केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शाळा घेतली. नाना पटोले यांनाही आम्ही ऑफर दिली होती. नाना पटोले हे एका पदावर टिकूच शकत नाहीत. त्यांना अध्यक्ष केले होते, पण तेही पद ते टिकवू शकले नाहीत. त्यामुळे नाना पटोले यांना फार महत्त्व देऊ नका, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT