Ashok Chavan Twitter sarkarnama
मुंबई

Ashok Chavan News : 'फिर भी दिल है काँग्रेसी', अशोक चव्हाण यांच्या ट्विटरवर...

Ashok Chavan Join BJP : भाजप प्रवेशानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.14) राज्यसभा उमेदवार म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले.

Jui Jadhav

Mumbai : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर पक्ष प्रवेशाचे कव्हर फोटो ठेवले. पण त्यांच्या ट्विटरवर अजूनही काँग्रेसचा उल्लेख आहे. त्यामुळे चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या मनात अजुनही काँग्रेस आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे. (Ashok Chavan News)

@AshokChavanINC असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे ट्विटर अकाऊंट आहे. INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. पक्ष प्रवेशाचा कव्हर फोटो ठेवणारे अशोक चव्हाण यांनी मात्र आपल्या नावातील INC चा उल्लेख वगळला नाही. भाजपमध्ये प्रवेश करताना देखील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख केला होते.

तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भाजप नाही आता काँग्रेस अशी सुधारणा करून दिली. या घटनेवरून संपूर्ण सभागृहात हशा पिकला होता. माझी पहिलीच भाजपची पत्रकार परिषद असल्याने चूक झाली असे म्हणत अशोक चव्हाण यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.

भाजप प्रवेशानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.14) राज्यसभा उमेदवार म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौथा उमेदवार उतरवणार नसल्याची घोषणा केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT