Ashok Chavan, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Ashok Chavan Resigned From Congress : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या!

Devendra Fadnavis : मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकींनंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Roshan More

Mumbai : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या प्रकारे भाजप वाटचाल करतोय. ते पाहून निश्चितपणे मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील, असा मला विश्वास आहे. आगे आगे देखो होता है क्या, असे म्हणत आणखी मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चांना फडणवीस यांनी बळकटी दिली.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. जननेता असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचे आहे, ते येत आहेत. लोकांशी कनेक्ट असणाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे आम्ही ठरवले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकींनंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी आज सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्याविषयी चर्चा केल्याची माहिती आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT