Ashok Chavan-Sanjay Jadhav-Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Chavan on sanjay Jadhav : अशोक चव्हाणांनी टोचले खासदार संजय जाधवांचे कान : ‘उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस...’

काम करत असताना पक्षांतर्गत ज्या गोष्टी असतात, त्या घरात बोलल्या पाहिजेत.

Vijaykumar Dudhale

मुंबई : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, त्याला घरचा आहेर म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस आहे. काम करत असताना पक्षांतर्गत ज्या गोष्टी असतात, त्या घरात बोलल्या पाहिजेत. परंतु जाहीरपणे असे बोलल्यामुळे नुकसान होते, असा सबुरीचा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार जाधव यांना दिला. (Ashok Chavan's advice to Shiv Sena MP Sanjay Jadhav)

शिवसेनेच्या (Shivsena) कार्यक्रमात बोलताना खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे तुमचे चुकलेच. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते, तर मुलाला मंत्री करायला नको होते. बाप गेला तरी पोरगा माझ्या डोक्यावर बसणारच आहे, हे लक्षात आल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केले, असे विधान जाधव यांनी केले होते. त्यासंदर्भात चव्हाण यांनी जाधवांना सल्ला दिला आहे.

बंडू जाधव यांनी ज्या काही भावना बोलून दाखविल्या आहेत, त्याला घरचा आहेर म्हणता येणार नाही. त्या त्यांच्या वैयक्तीक भावना आहेत. पण, राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्याला सामोरे जात असताना उद्धव ठाकरे हे मोठ्या धैर्याने आज ते सर्व सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे असो की आदित्य ठाकरे. यामध्ये फार मोठे मनोधैर्य असते, असेही चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले की, पक्ष सोडून पळ काढणं सोपं काम आहे. पण, तशा अवस्थेत पक्ष सांभाळणे आणि पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी निर्धार व्यक्त करून काम करणे, ही फार मोठी बाब आहे. त्यामुळे पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी असतील तर बाहेर बोलण्यापेक्षा बंडू जाधव यांनी व्यक्तीगत जाऊन बोललं पाहिजे, त्याला काही हरकत नाही. उद्धव ठाकरेंपुढे आपले विचार व्यक्त करायची असतील, तर बोलायला काही हरकत नाही. परंतु जाहीरपणे असे बोलल्यामुळे नुकसान होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT