Aslam Shaikh and Nawab Malik Sarkarnama
मुंबई

मलिकांनी गौप्यस्फोट केला अन् अस्लम शेख यांनीही दिली कबुली

मलिक यांनी रविवारी खळबळ उडवून दिली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना कार्डिलिया क्रुझवर (Cruise Drugs case) नेण्यासाठी आग्रह केला जात होता, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी रविवारी खळबळ उडवून दिली होती. मलिकांनी केलेला हा दावा खरा असल्याची कबुली शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

शेख यांनी मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर शेख यांनी त्यावर सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि त्यांच्या मुलांना ड्रग प्रकरणात अडकविण्यासाठी हा कट रचला जात होता, असा दावाही मलिकांनी केला होता. `उडता पंजाब`नंतर `उडता महाराष्ट्र` अशी प्रतिमा करण्यासाठी हे सारे सुरू होते, असा दावा मलिक यांनी केला होता. शेख यांनीही भाजपवर टीका करत हा दावा खरा असल्याचे सांगितले.

शेख म्हणाले, नवाब मलिक यांनी सर्व पुराव्यांसह माहिती समोर ठेवली आहे. मला कासिफ नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. क्रूझवर येण्याचे आमंत्रणही त्याने दिले होते. पण मी तिथे गेलो नाही. यापूर्वी मी कधीही कासिफला भेटलो नाही किंवा त्याला ओळखतही नाही. मी मुंबईचा पालकमंत्री असल्याने लोक अनेक कार्यक्रमांना मला बोलावतात. तसाच हा फोन असू शकतो, असं मला वाटलं. ड्रग्ज पार्टीबाबत माहिती असतं तर मीच पोलिसांना कारवाई करायला सांगितले असते, असं शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

दररोज मला 50 लोक आमंत्रित करतात. लग्न, वाढदिवस, अंत्यविधी अशा ठिकाणी लोक बोलवतात. तिथली माहिती मी घेतो. पण जिथे मला जायचेच नाही त्याचा नंबर घेणे, त्याची माहिती घेण्याची गरज वाटत नाही. कासिफला माझा नंबर कसा मिळाला, हे मला माहिती नाही, असंही शेख यांनी सांगितले. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातमध्ये 20 हजार कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज पकडले होते. पण त्याची चर्चा कुठेच होत नाही, असंही शेख म्हणाले.

दरम्यान, मलिक यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खान ड्रग केस हे खंडणी आणि अपहणारचे प्रकरण असल्याचा दावा केला. त्यात मोहित कंबोज, मनीश भालुशाली, सुनील पाटील, किरण गोसावी यांनी त्यात भूूमिका बजावली. आर्यन खान हा स्वतःहून कार्डिलिया क्रुझवर गेलेला नव्हता. तर त्याला बोलविण्यात आले होते. त्यात कंबोज याची महत्वाची भूमिका होती. एवढेच नाही तर अस्लम शेख यांनाही या क्रुझवर येण्यासाठी सातत्याने आग्रह केला जात होती. याबाबत ते आणखी माहिती पत्रकारांना देतील, असे मलिक यांनी सांगितले होते.

महाराष्ट्राची एसआयटी (SIT) आणि केंद्र सरकारनेही या प्रकरणी वेगळ्या पथकाकडून चौकशी सुरू केली आहे. त्यात या साऱ्या बाबींचा उलगड होईल. किरण गोसावी याने एनसीबीच्या कोठडीच आर्यन खान याच्यासोबत घेतलेल्या सेल्फिमुळे त्यांचे 18 कोटी रुपये बुडाल्याचे मलिक यांनी पुन्हा सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT