Minister Aditya Thackeray
Minister Aditya Thackeray  
मुंबई

शिवसेनेत पन्नाशी ओलांडलेल्या इच्छूकांना उमेदवारी नाही? ; आदित्य ठाकरे म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणूकांमध्ये (Election) शिवसेना शिवसेना 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांमुळं तर्कवितर्क लावले जात होते. मात्र या बातम्यांंमुळे सुरु असलेल्या सर्व चर्चा आणि अफवा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी फेटाळून लावल्या आहेत.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक ट्विट करत या सर्व चर्चा आणि तर्क-वितर्कांना पुर्णविराम दिला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेबद्दल (Shivsena) सुरु असणाऱ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 'विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं.' असं ट्विट करत त्यांनी माध्यमांमधून सुरु असणाऱ्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

शिवसेनेत तिकीट कोणाला मिळतं, हेदेखील त्यांनी यावेळी स्पषट केलं आहे. शिवसेनेत फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांचं तिकीट मिळतं. जे जनेतच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्यांना कोणताही भेदभाव न करता तिकीट दिलं जातं. असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना तरुण उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने चाचपणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. विशेष म्हणजे, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नगरसेवकांऐवजी आगामी निवडणुकीत शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही सांगितले जात होते. तर ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. ठाणे महापालिकेच शिवसेनेचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नगरसेवकांनी वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. या प्रभागांमध्ये पन्नाशीच्या आतील तरुण उमेदवारांना संधी देण्यासाठी शिवसेनेत खल सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT