Shiv Sena's Rebel MLAs in Guwahati
Shiv Sena's Rebel MLAs in Guwahati Sarkarnama
मुंबई

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत मुख्यमंत्र्यांचे अजब विधान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "महाविकास आघाडीत बाहेर पडा," अशी भूमिका घेत शिवसेना (shiv sena) नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी थेट बंडखोरी करत गुवाहाटी (eknath shinde in guwahati) गाठले. आपल्याकडे ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Eknath Shinde news update)

महाराष्ट्रातील राजकारण तापलं असताना यात आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma)यांनी आसाममध्ये सध्या मुक्कामास असलेल्या शिवसेना आमदाराबाबत अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी 'एएनआय'या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

आसाममधील (Assam) गुवाहाटीच्या (Guwahati)हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह तीन दिवसापासून मुक्कामाला आहेत. गुवाहाटीतील शिवसेनेच्या आमदारांबाबत हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असे हिम्मत बिस्वा सरमा यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी 'एएनआय'ला सांगितले.

"पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते," असे हिम्मत बिस्वा सरमा म्हणाले.

'एकनाथ शिंदे कोण'असा सवाल देशभर विचारला जात आहे. देशभर महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा सुरु आहे. शिंदेबाबत देशभर नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे.

तीन दिवसापासून गुगुलवर (Google Trend) 'एकनाथ शिंदे' सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती नसल्याने गुगलवर त्यांच्याविषयी माहिती, व्हिडिओ, बातम्या अनेक जण सर्च करीत आहेत.

देशभरात शिंदेंचा तीन दिवसांतील सर्च ट्रेंड ६४ टक्के एवढा राहिलाआहे. ही संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान, सौदी या देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT