Mumbai News, 31 Oct : "एकनाथ शिंदे हे 26 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री नसतीलच किंबहुना ते राजकारणात देखील नसतील"; असा मोठा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल आणि मनसेच्या पाठिंब्यावर 2024 चा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा होईल, असं वक्तव्य केलं होतं.
त्यांच्या या वक्त्यामुळे आता महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मागे पडले आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. याच चर्चांवर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत एकनाथ शिंदे 6 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री नसतील असा दावा केला.
संजय राऊत म्हणाले, "मी वारंवार सांगितलं आहे की, एकनाथ शिंदे हे 26 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री नसतील किंबहुना राजकारणात देखील नसतील. हे मी आता बोलत नाही तर फार पूर्वीपासून सांगत आहे. भाजपचा (BJP) जन्मच कपट कारस्थानामधून झाला आहे.
ते त्यांना जे मदत करतात अशा आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचा गळा कापणं हेच त्यांचं धोरण असतं. शिवसेना असेल किंवा नकली शिवसेना असेल अजित पवार असतील किंवा त्यांचे अन्य सहकारी असतील. काही दिवसांनी तुम्हाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सुद्धा धारातीर्थी पडलेले दिसतील." अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.