Sandeep Naik Sarkarnama
मुंबई

Sandeep Naik : चंद्रशेखर बावनकुळेसाहेब माझा राजीनामा स्विकारण्याबाबत...

Ganesh Naik Son Joined NCP SP: नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिली कृती ही केली आहे.

Pradeep Pendhare

Navi Mumbai News : नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक पुढील कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी त्यांनी भाजपशी निगडीत महत्त्वपूर्ण काम केले आहे.

गणेश नाईक यांनी भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. संदीप नाईक यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीमाना पाठवून दिला आहे. राजीनामा पाठवून देताच गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नाराज सर्वच ठिकाणी चाचपणी करत आहे. भाजप (BJP) नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी देखील कोणत्याही परिस्थिती निवडणुकीला समोरे जाण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपला राम राम करत, शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे. त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

संदीप नाईक यांनी राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडे पाठवला आहे. त्यात म्हटलं आहे की, नवी मुंबईत भाजपचे जिल्हाध्यक्षपद संभाळताना जिल्हा, मंडल कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ, सेल इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे काम केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर वाॅरियर्स, बूथ रचना पूर्ण करून सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यकमांचे यशस्वीरित्या आयोजन करून संघटना आणि बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचण्याचे काम केल्याची आठवण संदीप नाईक यांनी राजीनामा पत्रातून करून दिली आहे.

संदीप नाईक यांचे पक्षप्रवेशावेळी शक्तीप्रदर्शन

संदीप नाईक यांनी राजीनामा पत्रात कृतज्ञता व्यक्त करताना मी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे शेवटी म्हंटलं आहे. राजीनामा पत्र दिल्यानतंर संदीप नाईक यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला. संदीप नाईक यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

संदीप यांनी वडिलांच्या सल्ल्याला धुडकावला

गणेश नाईक यांनी भाजप पक्ष नेतृत्वाकडे बेलापूर आणि ऐरोली, अशी दोन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली होती. त्यावर भाजपने बेलापूर मतदारसंघ आमदार मंदा म्हात्रे यांना सोडला. त्यानंतर संदीप नाईक यांनी पक्षाला सूचक इशारा देत, वेगळी भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले होते. गणेश नाईक यांनी देखील संदीप नाईक यांना भाजपमध्ये थांबण्याचा सल्ला दिला होता. परंतु संदीप नाईक यांनी पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा देत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT