Ajit Pawar, Revanth Reddy Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : तेलंगणाच्या निकालाचे अजित पवारांनी केले अजब विश्लेषण ; म्हणाले...

Telangana Assembly Elections Results in Marathi : पवारांची इंडिया आघाडीवर टीका तर पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : एक्झिट पोलचे सर्व आडाखे बाजूला सारत भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आघाडी घेतली. तर तेलंगणात बीआरएसला धूळ चारत काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. चारही राज्यांच्या निकालाचे विश्लेषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. रेवंथ रेड्डी काँग्रेसमध्ये गेले नसते तर तेलंगणातही भाजपला संधी होती, अशा आशयाचे अजब मतही पवारांनी व्यक्त केले.

भाजपमध्ये काँग्रेससह इतर पक्षांतील अनेक नेत्यांनी प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. यात महाराष्ट्र राज्यही आघाडीवर आहे. अशी स्थिती असतानाही तेलंगणातील काँग्रेसच्या या यशाबाबत बोलताना मात्र अजित पवारांनी तिरकस विधान केले.

काँग्रेसच्या यशाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना देण्यात येत आहे. रेड्डी हे विद्यार्थीदशेत भाजप सलग्न असलेल्या अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी होते. हाच धागा पकडून अजित पवारांनी तेलंगणा भाजपमध्ये रेड्डी असते तर चित्र वेगळे असते, असा अजब दावा केला आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार ?

तेलंगणात काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी हे पूर्वी एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते. त्यांना काँग्रेसने आपल्या गोटात ओढून घेतले. आता रेड्डींच्या कर्तृत्वामुळेच काँग्रेस हे दिवस पाहत आहे. अन्यथा तेलंगणातील चित्र वेगळे असते, असे म्हणत अजित पवारांनी तेलंगणाच्या निकालाचे विश्लेषण केले.

तेलंगणातील भाजपची स्थिती काय ?

तेलंगणात सध्या भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे. भाजपसाठी ही बाब खूप मोठी असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. दरम्यान, राज्याच्या निर्मितीनंतर झालेल्या 2014 मधील निवडणुकीत भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. तर 2018 भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

2014 मध्ये रेड्डी हे तेलगू देशम पार्टीत होते. त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर झालेल्या 2018 च्या निवडणुकीत 19 जागा मिळाल्या होत्या. आता रेड्डींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने तेलंगणात मुसंडी मारली आहे. यावर बोलताना हे काँग्रेसचे यश नसून पूर्वीच्या एबीव्हीपीचा कार्यकर्ता असलेल्या रेड्डींचा करिष्मा असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT