NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

पवारांनी दिले मध्यावधीचे संकेत; गुजरात सोबतच महाराष्ट्रातही निवडणुका होण्याची शक्यता

शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस चालणार आहे.

सरकारनामा ब्युरो

विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होण्याचे पवारांनी या बैठकीत संकेत दिले. गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होऊ शकतात, असे पवार म्हणाले. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का याबाबत प्रश्न असल्याचेही पवार म्हणाले. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जावे काम करत राहावे. निवडणूक लागल्या तरी तयारी असावी त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असे आदेश पवार यांनी दिले. दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Ajit Pawar News, Political Crisis in Maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकिमध्ये आमदारांकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी करण्यात आली आहे. या पदाला अजितदादांच योग्य न्याय देऊ शकतात असे मत आमदारांकडून व्यक्त करण्यात आले आहे. आमदारांच्या मागणी नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे विधीमंडळात आता शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी मोठा पक्ष झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे येणार आहे. राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक बौलावण्यात आली आहे.

Sanjay Pandey

मुंबई पोलिस आयुक्त पदावरून नियुक्त झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी संजय पांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. हे समन्स कोणत्या प्रकरणात आहे, याची माहिती मिळू शकली नाही. पांडे हे शिवसेनेच्या जवळचे असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच ठाकरे सरकारच्या काळात अनेक भाजप नेत्यांवर त्यांनी कायदेशीर कारवाईचा दंडुका उचलला होता. त्यामुळे भाजप विरुद्ध पांडे असा सामना आधीपासूनच होता. आता ईडीने समन्स पाठविल्याने पांडे यांना अडकविण्याची तर तयारी केंद्रीय संस्थांनी केली नाही ना, याची शंका व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ``अध्यक्षांची उच्च अशी परंपरा विधानसभेला लाभली आहे. दादासाहेब माळवंणकर, शिवराज पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते. ते पुढे लोकसभेचे अध्यक्ष झाले. या अध्यक्षपदाचा लौकीक आपण वाढवाल, असा गौरव शिंदे यांनी केला.  याउप्पर या निमित्ताने शिंदे यांनी शिवसेनेला डिवचले. राज्यात आज शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्याचा दावा करताच सेनेकडून घोषणा देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 115 आमदार असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. सगळ्यांना वाटलं होत की देवेंद्र हे मुख्यमंत्री होतील मला काय भेटणार? पण भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला. जे वातावरण होतं ते आता बदललं आहे. अनेक आमदार माझ्यासोबत होते. त्यातील काही आमच्या विरोधकांच्या संपर्कात असल्याचा दावा करत होतो. मी म्हणत होतो की त्यांची नावे सांगा मी चार्टर विमानाने पाठवून देतो. पण तसे घडले नाही. 

शिंदे सरकारला बविआ, मनसेचा पाठिंबा

शिंदे सरकारला बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनीही पाठिंबा दिला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही सरकारचा बाजूने मतदान केले. राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत बविआची भूमिका महत्वाची ठरली होती.

शिंदे सरकारकडे 164 चं बहुमत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडे 164 आमदारांचं बहुमत असल्याचे सिध्द झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सरकारने 164 चा आकडा गाठला. त्यामुळे सरकार बहुमतात असल्याचे सिध्द झाले असून आता बहुमत चाचणीतही सरकारला कोणताही धोका असणार नाही.

बालाजी कल्याणकर यांनी 145 आकडा बोलला आणि शिंदे-फडणवीसांनी बहुमत गाठलं

राहुल नार्वेकरांना अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तर राजन साळवी यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चेतन तुपे यांनी मांडला. प्रस्ताव बाजूने मतदान करायचे आहे त्यांनी उजव्या बाजूला बसावे,  ज्यांना विरोधात मतदान करायचे त्यांनी डाव्या बाजूला बसावे, अशी सूचना करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. आवाजी पद्धतीने मतदानाला मविआने आक्षेप घेतला. त्यामुळे आता प्रथम राहुल नार्वेकर यांना मतदान देण्यासाठी आमदार आपल्या जागेवर उभे राहून नार्वेकरांना मत देत असल्याचे तोंडी सांगत आहेत.

जयंत पाटील

विधीमंडळाचे कामकाज सुरु झाले आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्याच्या बाकावर बसले आहेत. नाना पटोलेंमुळे हा दिवस पाहायला मिळाला, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती आम्हीदेखील राज्यपालांना केली होती. मात्र, ती त्यांनी मान्य केली नाही. आता ते नेमकी कशाची वाट पाहत होते हे लक्षात आले, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांनी लगावला. तसेच, आता राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची आम्ही पाठवलेली नावेही राज्यपालांनी तत्काळ मंजूर करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. 'मी माननीय राज्यपाल यांचं आभार मानण्यासाठी उभा आहे. राज्यपाल यांच्याकडे अनेकदा आम्ही गेलो. ते कशाला वेळ लावत होते हे आता कळलं. जर त्यांनी आधीच असं सांगितलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी आधीच केलं असतं, आता राज्यपाल यांनी आम्ही 12 आमदारांची यादी मान्य करावा म्हणजे सर्वांना न्याय मिळेल, असं जयंत पाटील म्हणाले.

सुनिल प्रभु यांचाच व्हिप अधिकृत असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेचाच व्हिप महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे विधिमंडळातील कार्यालय मुख्यमंत्र्याच्या आदेशाने सील करण्यात आले आहे. शिवसेनेचे १६ आमदारांनी निलम गोर्हेच्या कार्यालयात आहेत. मुंबईत कधी इतका कडेकोट बंदोबस्त पाहिलत का ? आमचे जे आमदार मित्रपक्ष आहे, त्यांच्यासोबतच आम्ही बसणार आहोत.  आरेचा निदर्शनाला मी जाऊ शकलो नाही. आम्हाला धोका दिला तरी चालेल पण मुंबईकरांना देऊ नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

काँग्रेस कडून सर्व आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. राजन साळवी यांना मतदान करण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडून हा व्हीप बजावण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले असून ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ हेही पाँझिटिव्ह असून ते काळजी घेत विधानभवनात दाखल होणार आहेत.

Nana Patole

काँग्रेसचे नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून रिक्त अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. ही निवड कुणाच्या नेतृत्वाखाली होणार येथूनच याचे नाट्य सुरू झाले आहे. मंत्रिमंडळ बरखास्त झाले असले तरी सभागृह अस्तित्वात असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालीच ही निवड होईल, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, तर झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असल्याने राज्यपालांनी नेमलेल्या हंगामी अध्यक्षांच्या नेतृत्वात ही निवड व्हावी, अशी भाजपची भूमिका आहे. याबाबत दोन्ही घटकांकडून सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबींची पडताळणी घेऊन नियोजन केले जात आहे.

assembly speaker election

भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर विधान भवनामध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार दाखल झाले आहेत. भाजपचे अन्य आमदार लवकरच विधानभवनात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांकडे दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी फेटे बांधले आहेत.

शिंदे गटाच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. ते आता विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. शिवसेनेनं विधानभवनातील आपलं कार्यालय सील केलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी त्यांचे फोन बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे याही वेळा देवेंद्र फडणवीस बाजी मारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना होत आहे. भाजपचे १०६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार यामुळे नार्वेकरांचा विषय सोपा मानला जात आहे. राहुल नार्वेकर हे सध्या केवळ ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिवाय ते निष्णात वकील देखील मानले जातात.साळवी हे राजापूरचे शिवसेनेचे आमदार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT