Milind Narvekar Sarkarnama
मुंबई

मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे.. ; मिलिंद नार्वेकर ॲक्शन मोडवर

ठाकरेंच्या प्रत्येक निर्णयांत राहणारे नार्वेकर सध्या कुठे आहेत ? अशी चर्चा रंगली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई :'मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे !' अशा शब्दात शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यावरची निष्ठा दाखविलेले आणि ऐन बंडाळीत ठाकरेंभोवती न दिसलेले शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar)विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविवारी मैदानात उतरले.

सभागृहाच्या कामकाजापूर्वी तासभर आधीच विधानभवन गाठून स्वपक्षातील उरल्यासुरल्या आमदारांसोबत चर्चा केली. विधान परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सभागृहाच्या गॅलरीत बसले. गेली पाच दिवस नार्वेकर हे मातोश्री आणि ठाकरेंपासून लांब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात होता. त्यात शिंदे आणि नार्वेकरांची मैत्रीचाही दाखला दिला गेला ठाकरेंच्या प्रत्येक निर्णयांत राहणारे नार्वेकर सध्या कुठे आहेत ? अशी चर्चा रंगली होती.

शिवसेना आणि ठाकरे सरकारची पडझड होत असतनाच नार्वेकर हे गायब असल्याच्या बातम्या रंगत होत्या. त्यावरही नार्वेकरांनी आपली भूमिका मांडली नव्हती. त्यामुळे नार्वेकरांच्या मनात नेमके काय चालले आहे, यावरून खल झाला. परंतु, विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी नार्वेकर हे रविवार सकाळी १० वाजताच विधान भवनात पोचले. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या आमदारांआधीच ते आल्याचे दिसले. त्यानंतर ते थेट शिवसेनेचे आमदार असलेल्या दालनात जाऊन साळवी, पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबतची चर्चा आटोपून कामकाज सुरू होताच नार्वेकर हे गॅलरीत गेले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल २८-२९ सावलीसारखे वावरणारे नार्वेकर हे ठाकरे कुटुंबियांचे निकटर्ती मानले जाते मातोश्रीनंतर सत्तेत वर्षा आणि सहयाद्री अथितिगृहात त्यांचा मोठा दबदबा ठेवला होता. अर्थात, तो आजही कायम असल्याचे नार्वेकरांच्या भूमिकेवरून रविवारी पुन्हा एकदा ठळक झाले.

आई अत्यवस्थ असल्याने नार्वेकर रुग्णालयात

मिलिंद नार्वेकर नेमके आहेत कुठे, या प्रश्नाची माध्यमात चर्चा सुरु असताना प्रत्यक्षात त्यांच्या आई अत्यवस्थ असल्याने ते रुग्णालयात चोवीस तास बसून आहेत.वृध्दापकाळाने त्या आजारी होत्या.आईच्या सेवेत तिच्या शेजारी असणे हे पुत्रकर्तव्य ते निभावत आहेत, असे समजते.

ठाकरेंपासून शिवसेनेच्या राजकीय आणि अराकीय निर्णयांत नार्वेकरांच्या शब्दाला वजन आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाआधी बंडखोर आमदारांसह सुरतला गेलेल्या शिंदे यांची समजूत काढण्याची जबाबदारी नार्वेकरांवर होती. मात्र, गेली पाच दिवसांत नार्वेकरांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा होत्या.

आधी म्हणजे, बंडखोरीनंतर (२२ जूनला) सरकार कोसळणार असल्याचे चित्र गडद होताच त्याचवेळी 'मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे' या आशयाचे नार्वेकरांचे २०२० मधील जुने 'ट्वीट’ नव्याने 'व्हायरल' झाले होते. त्यामुळे नार्वेकरांच्या मनातील शिवसेना, ठाकरेंवरील निष्ठा दिसून आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT