मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया (Antilia) या निवसास्थानाजवळ सापडलेली स्फोटके तसेच, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणी अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याला आज थेट सेवेतून बडतर्फे करण्यात आले. त्यांच्या बडतर्फीचा आदेश मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police) काढला आहे.
वाझे याला बडतर्फ केले जाईल, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अखेर कलम ३११ अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ही कारवाई केली आहे. अँटिलिया आणि हिरेन हत्या प्रकरणामुळे संपूर्ण कटामुळे मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली. असे कार्य अशोभनीय असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे.
मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली त्यावेळी त्याच्या तोडांत ५ ते ६ रुमाल कोंबलेले होते. हे रुमाल दुसरं तिसरं कुणी नसून निंलबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेनेच कोबंल्याचं सांगितलं जात आहे. कारण मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी वाझे हे सीसीटिव्हींची नजर चुकवत लोकलने ठाणेला आला होता. त्यावेळी कळवा स्थानकावर त्याने हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जातं आहे. NIAच्या तपासात कळवा स्थानक परिसरातले CCTV तपासले असता. वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे CCTV मध्ये कैद झालं आहे. CCTV अस्पष्ठ असला तरी देहबोली आणि कपड्याचा रंग ही वाझेच्या कपड्यासारखाच आहे. त्या अनुषंगाने इतर आरोपींकडे चौकशी केली होती.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIAनं अटक केलेला पाचवा आरोपी सुनिल माने याच्या घरी NIA नं नुकतीच छापेमारी केली. त्यावेळी NIAनं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपञ आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.
या आधी वाझेसोबत असलेला रियाझ काझी या एपीआयला देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यानेही पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेला मदत केली होती. निलंबित पोलिस विनायक शिंदेही एनआयएच्या कोठडीत आहे. त्यामुळे वाझेसोबत जे होते ते सर्वजण आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने त्याबाबतचा अहवालही राज्य गृहमंत्रालयाला पाठवला आहे. सुनिल माने हा मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक होता. त्यादरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला त्याने मदत केली होती. विशेषत: मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला सुनील माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.