Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

'त्यावेळी मी मंत्रालयाकडे ढुंकूनही पाहत नव्हतो'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आता मुंबईकरांना लोकल, बस आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता राहिली नसून या सर्वांसाठी आता एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCAC Card) जारी करण्यात आले आहे. या कार्डचे लोकार्पण आज (ता.25 एप्रिल) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषण करत असतांना आपला कॅालेज जीवनाती बेस्ट बसने केलेल्या प्रवासाबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला.

एक आठवण सांगत असतांना ठाकरे म्हणाले की, तेव्हा ज्यावेळी मंत्रालयाजवळ बस थांबायची तेव्हा मंत्रालयाकडे आम्ही ढुकूनही बघत नव्हतो सरळ कॅालेजकडे निघून जायचो मात्र, आता काळ बदलला आहे. अशा अनेक आठवणी त्यांनी यावेळी सांगत बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, (Anil Parab) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, मेट्रोच्या एका मार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले होते. आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन होत आहे. या दोन्ही गोष्टी अभिमान वाटव्यात अशा आहेत. आज फक्त आणि फक्त बेस्टच कौतुक करायला येथे आलो आहे. याचे कारण सहाजिकच पक्का मुंबईकर असल्याने येथील रिक्षा, बस, लोकल व बहूतेक खासगी आणि प्रवासी वाहनातून माझा प्रवास झाला आहे.

सचिन तेंडूलकर आणि अनिल कपूरची फिल्म बघितलीत मग मलाही माझ बालपण आठवलं मी शाळेत जात असतांना जातांना 115 नंबरच्या बसने जायचो अन् येतेवेळी 114 बसने यायचो. आणखी एक 87 लिमिटेड नंबरची बस होती. तेव्हा शाळेत जातांना ही बस चालत होती. नंतर जे.जे स्कूल ऑफ आर्ट ला आल्यानंतर 87 नंबरची एक बस होती तीचा कलानगरच्या बाहेर पडल्यावरच बसस्टॅाप होता. बरेचदा असे व्हायचे की खुप पाऊस पडायचा किंवा गरम व्हायचे यामुळे आम्ही मित्र ठरवायचो की चला आज बसनेच जाऊयात. तेव्हा आम्ही त्या बसने जायचो मात्र, त्या बसचा स्टॅाप हा आमच्या कॅालेज जवळ नव्हता तर मंत्रालयाच्या दारासमोर होता. मात्र, तेव्हा आम्ही बसमधून उतरलो की, मंत्रालयाकडे ढुंकूनही बघायचो नाही. आणि कॅालेजकडे पळायचो मात्र, आता काळ बदलला आहे. आता यायची सोय झाली आहे. गेले दिड वर्ष कोरोनामुळे मंत्रालयात जायला जमले नव्हते. मात्र, आता जायला सुरूवात केली आहे. पण हा एक योगायोग आहे. बसप्रमाणेच आयुष्याचाही असाच प्रवास असतो. थांबे कितीही येवोत मात्र, थांबायचे नसते पुढे चालायचे असते, असे सांगत बेस्टच्या वाहकांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री अनेक झाले होतील, मात्र बिरुद कोणतं लागत ते महत्वाचे आहे. कोरोकाळात बेस्टने केलेल्या कामाचे ठाकरे यांनी कौतुक करत कोरोना काळात बेस्टचे महत्त्वाचे योगदान सांगत मुंबई बस स्टॉपचं मॉडेल केंद्र सरकारने मागितले असल्याचेही सांगितले. याबरोबरच मुंबईकरांची धडपडीचे आणि योगदानाचेही कौतुक ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT