Mahesh Tapase NCP
Mahesh Tapase NCP Sarkarnama
मुंबई

योगींच्या राजवटीत दलितांवर अत्याचार : हाच का सबका साथ सबका विकास?

सरकारनामा ब्युरो

मुंबई - उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी महाराष्ट्रात कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून योगी आदित्यनाथ यांना टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ व भाजपवर टीका केली. ( Atrocities on Dalits during the reign of Yogis: Why this development for all? )

महेश तपासे म्हणाले, भाजप सत्तेत आल्यापासून भारतात दलित अत्याचारात वाढ होत आहे. हाच सबका साथ आणि सबका विकास आहे का,? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशमधील पवटी ( मुझफ्फरनगर ) गावात दलितांनी शेतात गेल्यास जोड्याने मारण्याची आणि 5 हजार रुपयांचा दंड व कूपनलिकेजवळ येण्याचे धाडस केल्यास त्यांना इतर गंभीर परिणामांची घोषणा केल्याची घटना समोर आली आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दलित सुरक्षित नाहीत, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील दलितांच्या सुरक्षेची वैयक्तिक खात्री द्यावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

दरम्यान अशा घटना घडू नये यासाठी देशभर ग्रामसभा घेऊन इतर समाजाला मागासवर्गीयांसाठी संवेदनशील करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT