Sharad Pawar, Atul Bhatkhalkar
Sharad Pawar, Atul Bhatkhalkar sarkarnama
मुंबई

'पवारांनी असेच मुख्यमंत्रीपद ताब्यात घेतले होते, तेव्हा पराभव झाला होता...'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात एसटी (ST strike) कर्मचाऱ्यांचा संप दोन महिन्यापासून सुरु आहे. त्यामुळे एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बैठक घेण्यामागे इतर मान्यवरांची अकार्यक्षमता दाखवून देणे हा हेतू होता का, असा चिमटा भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी काढला.

पवार यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले होते. कामावर आल्यास कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असेही पवरा यानी सांगितले होते. आधीच कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत संप मिटल्यावर सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन परब यांनी दिले आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या सहभागावर भातखळकर यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत कोणत्या अधिकारात पवार यांनी या बैठकीचे आयोजन केले, त्यांना कोणता विशेष घटनात्मक अधिकार आहे. या बैठकीला नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री हजर नव्हते, त्यांचे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार का हजर नव्हते, असा सवाल भातखळकर यांनी केला. मालमत्ता करमाफीची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री टीव्हीवर येतात. मात्र, त्यांना सह्याद्रीवर प्रत्यक्ष किंवा निदान ऑनलाईन स्वरूपात येणे कठीण होते का, या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत पवारांनी घेतलेल्या बैठकीला कोणते कायदेशीर अधिष्ठान आहे, असे प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

हेदेखील ध्यानात ठेवा...

राज्यातल्या १९९२-९३ च्या जातीय दंगलींनंतर शरद पवार यांनी अशाच प्रकारे सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून ते पद स्वतःच्या ताब्यात घेतले होते. मात्र, दोनच वर्षांत झालेल्या निवडणुकीत जनतेने त्यांचा सपशेल पराभव केला, हेदेखील ध्यानात ठेवावे, असा टोला भातखळकर यांनी लगावाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT