Mhada Lottery Konkan 2024 Thane News :
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडाच्या घराची सोडत काढण्यात आली. या वेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आपला वीस वर्षांपूर्वीचा म्हाडाचे घर लागल्याचा अनुभव सांगितला.
त्यावेळच्या अडीअडचणींना कंटाळून घर न घेता परत केल्याचे त्यांनी सांगितले. आता वीस वर्षांपूर्वीप्रमाणे घर लागल्यावर प्रामुख्याने विशिष्ट कागदपत्रांच्या अडीअडचणी येत नसल्याचे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले. दीड लाख गिरणी कामगारांना घरे मिळणार असून, दर महिन्याला राज्यात कुठे ना कुठे म्हाडाच्या घरांची लॉटरी सोडत काढण्यात येणार असल्याचेही मंत्री सावे म्हणाले.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांची सोडत शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यासाठी सर्वांना हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन विविध प्रकल्प राबवित आहे, असे सांगत म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे आज घरांची सोडत काढण्यात आली. प्रथमच पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली. याद्वारे कुणालाही तक्रार करण्याची संधी ठेवण्यात आली नाही. निवड झालेल्या लाभार्थींना ऑनलाइन मेसेज पाठविण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील काही वर्षांपासून घरांची नोंदणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. ई फॉर्म पद्धत सुरू करण्यात आली असून, नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. यापुढे लाभार्थींना पैसे भरण्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यापूर्वी शासनाने पारदर्शकता आणून मुंबई, पुणे मंडळाची संगणकीय पद्धतीने सोडत काढली आहे.
आगामी काळात गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचा आमचा संकल्प आहे. कामगार आयुक्तांच्या माध्यमातून दीड लाख गिरणी कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना लवकरच हक्काच्या घरांचे वितरण करण्यात येणार आहे, असे मंत्री अतुल सावे म्हणाले. दरम्यान, त्यांना 20 वर्षांपूर्वी म्हाडाचे अशापद्धतीने लॉटरी सोडतीत घर लागले होते. ती आठवण काढत त्यावेळी आलेल्या अडीअडचणींमुळे ते घर न घेता परत केल्याचे सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.