Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय, बॉलीवूड क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
आता पोलिस तपासात बिश्नोई टोळीतील हत्यारांबाबत एक-एक बाब समोर येत आहे. यातील तीनही आरोपी हे कुर्ला येथील पटेल चाळीत राहत होते. मात्र, आरोपींबद्दल माहिती कळताच चाळीत नागरिकांना एकच धक्का बसला.
शिवकुमार, गुरूमेल सिंग, धर्मराज कश्यप हे मुंबईतील (Mumbai) कुर्ला येथील पटेल चाळीत राहत असे. हत्येचा कट शिजल्यानंतर शिवकुमारला मुंबईत जाऊन कुर्ला परिसरात भाड्यानं घर शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
दलालाच्या मार्फत शिवकुमारनं कुर्ला पश्चिमेकडील पोलिस पटेल चाळीत घर शोधले. घर मालकाला दुप्पट भाडे देऊन सप्टेंबरपासून खोली क्रमांक 225 मध्ये शिवकुमार राहायला आला. नंतर कश्यप आणि सिंग हेही त्याच्याकडे राहायला आले.
मात्र, येता-जाता कधी तरी ‘अंकल-आंटी कैसे हो?’ विचारणारे आणि आदरानं वागणारे तिघेजण सिद्दीकी यांचे हत्यारे निघाल्यानं कुर्ला पोलिस पटेल चाळीतील रहिवाशांना धक्का बसला.
गुरमेल सिंग हा अनेकदा सिगारेट ओढताना दिसत असे. शेजाऱ्यांच्या श्वानाबद्दलही तो चौकशी करायचा. इंग्लिशमध्ये बोलायचा. ते चेहऱ्यावरून चांगल्या घरातले वाटत असल्यानं त्यांच्याविषयी कधी संशय आला नाही, अशी माहिती शेजाऱ्यानं दिली.
दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तातडीनं धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग यांना अटक केली आहे. शिवकुमार हा फरार आहे. तर, पुण्यातून फेसबुक पोस्ट टाकणारा प्रविण लोणकर यालाही अटक केली आहे. प्रविणचा भाऊ शुभम लोणकर, ज्याच्या अकाउंटवरून हत्येची जबाबदारी घेण्यात आली होती, तोही फरार आहे. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.