Bachchu Kadu on Ambadas Danve
Bachchu Kadu on Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu: दानवे-लाड वाद म्हणजे नळावरील बायकांची भांडणं; बच्चू कडू यांनी दानवेंना फटकारलं

Pradeep Pendhare

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यातील वादावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्ष नेत्याने सभागृहाची गरीमा सांभाळली पाहिजे. ती जमत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा," असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये शिवसेना नेते, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (Bachchu Kadu) यांना त्यांच्या वागणुकीवरून फटकारले.

नळावर बायकांची भांडणं व्हायची तसेच अंबादास दानवे (Ambadas Danve)चिडले होते. अंबादास दानवे यांनी कोणचा राग कुणावर काढू नये. सभागृहाची गरिमा विरोधी पक्षनेता घालवत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला.

शिवसेना नेते विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या काल सभागृहात चांगलीच हमरी-तुमरी झाली. अंबादास दानवे यांनी यावेळी प्रसाद लाड यांनी केलेल्या हातवारे केल्यावरून काहीशी अपशब्द वापरले. यावरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आमने-सामने आले आहेत.

अंबादास दानवे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बाहेर कुठे असता, तर 'प्रसाद'च दिला असता, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आपली भूमिका आज सकाळी कायम ठेवली. यामुळे विधिमंडळात गोंधळ होण्याची शक्यता आहे. यावर इतर पक्षातील आमदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी देखील अंबादास दानवे यांना फटकारले आहे.

आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या वैदर्भीय भाषेत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांना फटकारले. "पूर्वी नळावर बायकांमध्ये भांडण व्हायचे. काही मुद्दा नसला की बायका भांड्याला लागायच्या. तसाच काहीसा हा भांडणाचा प्रकार आहे. विरोधी पक्षनेता अशा पद्धतीने वागतो आहे. त्यामुळे हे सर्व काही हास्यस्पद आहे", असे म्हणत बच्चू कडू यांनी दानवे आणि लाड यांच्या वादाची खिल्ली उडवली.

"विरोधी पक्ष नेता, कोणत्याही पक्षाचा, असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी आपल्या सभागृहाची गरिमा सांभाळली पाहिजे. दानवेंनी चिडून, कोणावरचा ताव कोणावर काढू नये. विरोधी पक्षनेता सभागृहाची गरिमा, अशा पद्धतीने घालवत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे," असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला.

राजकारणाची पातळी खालवली का? या मुद्द्यावर बोलताना पातळीच नाही राहिली, तर घालवणार काय, असा टोला देखील आमदार बच्चू कडू यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT