नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सन्मानजनक वागवणूक न मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडील लहान घटक पक्ष विधानसभेपूर्वीच मोर्चबांधणी करीत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चूल मांडण्याच्या विचारात आहेत.
लहान पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी करणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत, अशातच मोठी माहिती समोर येत आहे. 'प्रहार'संघटनेचे नेते, महायुतीतील आमदार बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे समजते. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीची इच्छा व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांची त्यांना साथ मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले तर हा महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू मोर्चा काढणार आहे. कडू आज काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महायुतीसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे.
राज्यातील शेतकरी, मजूर आणि अपंगांचे प्रश्न आम्हाला मांडायचे होते, पण सत्ताधाऱ्यांना या विषयांवर चर्चा करायला वेळ नाही. पुढील निर्णय घेण्यापूर्वी आम्ही शेतकरी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचू, असे कडू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
राजू शेट्टी, इम्तियाज जलील, बच्चू कडू हे तीनही आक्रमक, लढाऊ नेत्यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन केली तर ही तिसरी आघाडी महायुती अन् महाविकास आघाडीच्या नेत्याचे टेन्शन वाढवणारी ठरेल.
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी राज्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊन महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देणार असल्याचे स्पष्ट केले. ही तिसरी आघाडी विधानसभेत राज्यातील भाजप प्रणीत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित आहे.
गेल्या आठवड्यात राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती.
दोघांनी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे मान्य केल्याचेही शेट्टी यांनी सांगितले होते. त्यास पुष्टी देत इम्तियाज जलील यांनीही तिसऱ्या आघाडीची शक्यता तपासली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीलो मोठा स्कोप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.