MLA Kshitij Thakur Latest Marathi News, MLA Hitendra Thakur Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

शिरगणती झाली अन् अखेर ठाकूरांचं नेमकं मत कुणाला हे उघड!

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिरगणतीद्वारे मतदान पार पडले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पडली. यावेळी शिरगणती करून मतदान झाले. सरकारच्यावतीने राहुल नार्वेकर यांना 164 मतं पडली. तर विरोधकांचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. त्यामुळे नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाली. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीवेळी सर्वाधिक 'भाव' खालेल्या बहुजन विकास आघाडीनेही यावेळी आपले पत्ते खुले केले. (Assembly Speaker Election News Update)

'बविआ'चे तीन आमदार आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) (वसई) त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर (नालासोपारा) आणि राजेश पाटील (बोईसर) असे बविआचे तीन आमदार आहेत. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी या तीन मतांना खूप महत्व प्राप्त झालं होतं. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांनी त्यांच्या मतांसाठी उंबरे झिजवले.

अखेरपर्यंत ठाकूर यांनी आपले पत्ते खूले केले नाहीत. कोणत्याही उमेदवाराला त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला नाही. पण राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला मतदान केल्याची चर्चा होती. पण आतापर्यंत ठाकूरांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केली नव्हती.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान शिरगणती पध्दतीने झाले. त्यामुळे यावेळी सर्व सदस्यांना जागेवर उभे राहून मतदानाचा हक्क बजावावा लागला. यावेळी हिंतेंद्र ठाकूरांसह इतर दोघा आमदारांनी नार्वेकरांच्या बाजूने मतदान केले. मागील तीन निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाकूंनी कुणाला मतदान केलं हे उघड झालं. त्यामुळे आता त्यांनी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपच्याच उमेदवारांना मतदान केलं असावं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मतदानाला सुरूवात होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार व्यक्त करत खोचक टीका केली. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत मागील एका वर्षापासून अध्यक्षपदाची जागा भरायची होती. त्यासाठी आम्हा महाविकास आघाडीचे नेते वारंवार जाऊन राज्यपालांना भेटलो. त्यांना या पदाची निवडणूक लावावी अशी विनंती केली होती. मात्र राज्यपाल वारंवार कारणे देऊन टाळत होते. दुसरे सरकार सत्तेवर येताच विधानसभेची निवडणूक लावली, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT